मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: कुणी दिली होती सलमान खानला जीवे मारण्याची धमकी? झाला मोठा खुलासा!

Salman Khan: कुणी दिली होती सलमान खानला जीवे मारण्याची धमकी? झाला मोठा खुलासा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 12, 2023 09:44 AM IST

Salman Khan Death Threats: नुकतीच पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यावेळी त्याला तारीखही सांगण्यात आली होती. आता अखेर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.

Salman Khan
Salman Khan

Salman Khan Death Threats: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. सलमान खानला धमकी मिळण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याला अनेकदा अशा धमक्या देण्यात आल्या आहेत. नुकतीच पुन्हा एकदा फोन करून सलमानला जीवे मारण्याची धमकी देऊन तारीखही सांगण्यात आली होती. आता अखेर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या १६ वर्षीय मुलाला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अवघ्या १६ वर्षाच्या मुलाने असे कृत्य केले, हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या १६ वर्षीय मुलाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सलमानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे बोलले जात आहे. धमकीचा हा फोन येताच मुंबई पोलिसांनी हे प्रकरण थेट गुन्हे शाखेकडे सोपवले होते. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, या धमकीच्या कॉलचं कनेक्शन राजस्थानमधील बारमेरला येथे सापडलं. यानंतर अजिबात उशीर न करता गुन्हे शाखेने या परिसराची नाकेबंदी करून सदर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला पकडले. रिपोर्ट्सनुसार, या मुलाने पोलिसांना त्याचे नाव ‘रॉकी’ असल्याचे सांगितले आहे.

आरोपी मुलाने फोनवर सांगितले होते की, तो येत्या ३० एप्रिलला सलमान खानला मारणार आहे. सध्या याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरू आहे. कारण आरोपी अल्पवयीन असून, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस आरोपीची चौकशी करत असून, त्याने हा फोन का केला असावा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी काल रात्रीच हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवले होते. धमकीचा हा फोन आल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आतच पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला पकडले आहे. आता या आरोपीला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सलमान खानला सतत मिळणाऱ्या या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षेचा विचार करून सलमानने नुकतीच निसानची नवी बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. त्याचबरोबर अभिनेत्याला मिळणाऱ्या धमक्यांवरही पोलिस तातडीने कारवाई करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग