Suhana Khan: मनोरंजन विश्वात पदार्पण करण्याआधीच शाहरुख खानच्या लेकीची मोठी झेप!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suhana Khan: मनोरंजन विश्वात पदार्पण करण्याआधीच शाहरुख खानच्या लेकीची मोठी झेप!

Suhana Khan: मनोरंजन विश्वात पदार्पण करण्याआधीच शाहरुख खानच्या लेकीची मोठी झेप!

Published Apr 12, 2023 07:35 AM IST

Suhana Khan becomes Brand Ambassador: सुहाना खान अभिनेत्री म्हणून याचवर्षीच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सुहानाने आणखी एक मोठं यश संपादित केलं आहे.

Suhana Khan
Suhana Khan

Suhana Khan becomes Brand Ambassador:बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. सुहाना खान अभिनेत्री म्हणून याचवर्षीच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सुहानाने आणखी एक मोठं यश संपादित केलं आहे. पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच ती आणखी एका प्रोजेक्टमध्ये सहभागी झाली आहे. सुहाना खान आता न्यूयॉर्कच्या ‘मेबलीन’ या मोठ्या ब्रँडला एंडोर्स करताना दिसणार आहे.

नुकतीच सुहाना या ब्रँडच्या प्रोडक्ट लॉन्च इव्हेंटमध्ये दिसली. या इव्हेंटदरम्यान सुहाना खान तिच्या फॅशन सेन्सने सर्वांना प्रभावित करताना दिसली. यावेळी सुहानाने खास लाल रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यापूर्वीच ती या ब्रँड एंडोर्समेंटमध्ये सामील झाली आहे. या इव्हेंटमध्ये तिच्यासोबत अनेक बड्या व्यक्ती दिसल्या.

उद्योग विश्वातील चर्चेतील नाव अनन्या बिर्ला आणि मॉडेल अक्षा केरुंग या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. याशिवाय अनेक बहुचर्चित चेहरे या इव्हेंटमध्ये उपस्थित होते. बॉलिवूड डेब्यूच्या आधीच सुहाना खानला इतकी मोठी संधी मिळाल्याने चाहते देखील तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत. अलीकडेच सुहाना खान तिचे वडील शाहरुख खान यांच्या आयपीएल टीमला अर्थात केकेआरला सपोर्ट करताना मैदानात दिसली होती. यावेळी ती तिची मैत्रिण शनाया कपूरसोबत सामना पाहण्यासाठी कोलकात्याला पोहोचली होती. यादरम्यानचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते.

सध्या सुहाना खान तिच्या आगामी'द आर्चीज'चित्रपटामुळे चर्चेत आहे. सुहाना खान चित्रपटांमध्ये आपला जलवा कधी दाखवणार याची चाहत्यांनाही बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. तिच्या या पहिल्या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर यांनी केले असून, या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये सुहाना खानसोबतच बॉलिवूडचे अनेक स्टारकिड्स मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत.

 

Whats_app_banner