मराठी बातम्या  /  Entertainment  /  Shiv Thakare Archana Gautam Coming Together Again For Entertainment Ki Raat Show

Shiv Thakare-Archana Gautam: राडा तर होणारच! शिव ठाकरे आणि अर्चना गौतम पुन्हा येणार आमने सामने!

Shiv Thakare and Archana Gautam
Shiv Thakare and Archana Gautam
Harshada Bhirvandekar • HT Marathi
Apr 12, 2023 08:47 AM IST

Shiv Thakare and Archana Gautam in New Show: ‘बिग बॉस १६’चे दोन सर्वात लोकप्रिय स्पर्धक अर्थात अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री अर्चना गौतम ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे.

Shiv Thakare and Archana Gautam in New Show: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस सीझन १६’ संपून आता बराच काळ लोटला आहे. या शोनंतर त्यात सामील सगळेच कलाकार आपापल्या आयुष्यात खूप व्यस्त झाले आहेत. तर, यापैकी काही कलाकारांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनाला सुरुवात केली आहे. अभिनेता शालीन भानोत एकता कपूरच्या 'बेकाबू' या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर, अभिनेत्री टीना दत्ता देखील एका नव्या शोमध्ये जय भानुशालीसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.  यात सध्या चर्चा सुरू झाली ती शिव ठाकरे आणि अर्चना गौतमची...

ट्रेंडिंग न्यूज

‘बिग बॉस १६’चे दोन सर्वात लोकप्रिय स्पर्धक अर्थात अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री अर्चना गौतम ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. बिग बॉस या शोनंतर हे दोघे पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या आधी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळाले होते. इतकी भांडणं झाल्यावरही हे दोघे एकत्र काम करण्यास तयार होतील, असे प्रेक्षकांना कधीच वाटले नव्हते. मात्र, या जोडीने प्रेक्षकांना देखील सरप्राईज दिले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार ‘बिग बॉस १६’च्या घरात एकमेकांसोबत भांडणारे अर्चना गौतम आणि शिव ठाकरे हे दोघे हर्ष लिंबाचिया आणि पुनित पाठक यांच्या शो 'एंटरटेनमेंट की रात'मध्ये एकत्र येऊन चाहत्यांसाठी मनोरंजनाचा डोस दुप्पट करणार आहेत. मात्र, हे दोघेही या शोमध्ये कायमस्वरूपी सहभागी होणार नसून, केवळ पाहुणे म्हणून मंचावर हजर राहणार आहेत. अर्चना आणि शिव जेव्हा बिग बॉसच्या घरात होते, तेव्हा या दोघांनी एकत्र खेळावे, असे सगळ्याच चाहत्यांना वाटत होते. चाहत्यांनी अनेकदा दोघांना एकत्र खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, 'बिग बॉस'च्या घरात ज्याप्रकारे दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर शो संपल्यानंतरही हे दोघे भेटतील असे कोणालाच वाटले नव्हते.

आता दोघेही पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येत असल्याच्या बातमीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. ‘बिग बॉस’ हा शो संपल्यानंतर आणि कलाकार त्यांच्या सामान्य जीवनात व्यस्त झाल्यानंतर, असे खूप कमी स्पर्धक आहेत जे एकमेकांशी कनेक्टेड राहतात. ‘बिग बॉस १६’ हा शो संपल्यानंतर एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांची मैत्री संपुष्टात आली. तर, अर्चना गौतम आणि प्रियांका चहर चौधरी यांची मैत्री आजही कायम आहे.

WhatsApp channel