मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक! गुन्हेगारांची केली होती मदत

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक! गुन्हेगारांची केली होती मदत

May 07, 2024, 11:14 AM IST

  • Salman khan house firing case: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एकाला अटक केली आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक! गुन्हेगारांची केली होती मदत

Salman khan house firing case: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एकाला अटक केली आहे.

  • Salman khan house firing case: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एकाला अटक केली आहे.

Salman khan house firing case: ईदच्या दुसऱ्याच दिवशी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचे प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे. या बाबतीत एकामागून एक नवीन अपडेट्स समोर येत आहेत. नुकतेच या प्रकरणातील एका आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने हे प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. या व्यक्तीने तुरुंगात आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र, आरोपी अनुज थापनच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी पाचव्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या गॅलेक्स अपार्टमेंटमधील निवासस्थानाबाहेर १४ एप्रिलच्या पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. हल्लेखोर मोटरसायकलवरुन आले होते व त्यांनी सलमानच्या घराच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या. यापैकी २ गोळ्या सलमान खानच्या लिव्हिंग रुमच्या भिंतीला लागल्या होत्या. या घटनेनंतर सलमान व त्याच्या कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

कोण आहे पाचवा आरोपी?

आता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एकाला अटक केली आहे. या व्यक्तीला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद चौधरी असे आरोपीचे नाव आहे. मोहम्मद चौधरीवर या प्रकरणात गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांना मदत केल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन गुन्हेगारांना पैशाची मदत केली होती.

अनुज थापनचे काय झाले?

सलमान खान गोळीबार प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अनुज थापन याचा तुरुंगात मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणातील गुंतागुंत आणखीनच वाढली आहे. अनुज थापनच्या आत्महत्येचा सिद्धांत त्याच्या कुटुंबीयांनी चुकीचा असल्याचा दावा केला असून, त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा पोलिस कोठडीतील मृत्यू संशयास्पद असून, त्याची योग्य चौकशी व्हायला हवी, असे कुटुंबीयांचे मत आहे. आपल्या मुलाने आत्महत्या केली यावर कुटुंबीयांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीचे नाव समोर आले असून, लॉरेन्सचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई याने या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे.

पुढील बातम्या