मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 06, 2024 09:50 PM IST

स्मिता तांबेच्या ‘कासरा’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळाली आहे.

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?
स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

शेतकऱ्यांच्या आयुष्यावर भाष्य करणारे अनेक चित्रपट आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अनेक चित्रपटांमधून शेतकऱ्याच्या जीवनातील संघर्ष मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. शेतकऱ्याचं आयुष्य हे एका सामान्य माणसापेक्षा अतिशय वेगळं असतं. पीक पाण्यावर जगणारा शेतकरी अवघ्या जगाचा अन्नदाता आहे. मात्र, या अन्नदात्यावरच अनेक संघर्ष करण्याची वेळ येते. शेतकऱ्यांचा हाच संघर्ष मोठ्या पडद्यावर आजवर आपण अनेकदा पाहिला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या आयुष्यातील एक वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न ‘कासरा’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारी अभिनेत्री स्मिता तांबे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. स्मिता तांबेच्या ‘कासरा’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळाली आहे. सोशल मीडियावर ‘कासरा’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्याचं जगण्याच्या संघर्षाचं दर्शन घडवणाऱ्या ‘कासरा’ चित्रपटाचा ट्रेलर सगळ्यांनाच आवडत आहे. शेती, शेतकरी या विषयावर आजवर अनेक चित्रपट झाले असले, तरी ‘कासरा’ या सगळ्यात वेगळा ठरणार आहे. या चित्रपटाचे सकस कथानक, उत्तम अभिनय हीच याची जमेची बाजू आहे. येत्या २४ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शेतकऱ्यांचं जगणं, संघर्षाची कथा ‘कासरा’!

शेतकरी, शेती यांच्याशी निगडीत असणारे बाजारपेठ, हमीभाव, तंत्रज्ञान असे अनेक मुद्दे यात पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच पारंपरिक शेती ते आधुनिक शेती या अनुषंगाने शेतकऱ्यांचं जगणं, संघर्षाची कथा ‘कासरा’ हा चित्रपट दाखवणार आहे. चित्रपटाच्या टीझर आणि गाण्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेलरमधून विषयाचं गांभीर्य दाखवतानाच चित्रपटाचं उत्तम कथानक, अनुभवी कलाकार, अभिनययासह चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याचंही दिसत आहे. त्यामुळेच या नव्या चित्रपटाविषयी आता उत्सुकता आणखी वाढली आहे. शेतकऱ्याचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता २४ मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

उत्तम कलाकारांची फौज!

रवी नागपूरे यांच्या साई उत्सव फिल्म्स या निर्मिती संस्थेनं ‘कासरा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विकास विलास मिसाळ यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रवी नागपूरे यांच्याच कथेवर महेंद्र पाटील यांनी पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन, प्रशांत नाकती, संकेत गुरव यांनी संगीत दिग्दर्शन, तर प्रशांत नाकती यांनी गीतलेखन केलं आहे. चित्रपटात स्मिता तांबे, गणेश यादव, जनमेजय तेलंग, तन्वी सावंत, राम पवार, प्रकाश धोत्रे, डॉ. वंदना पटेल, कुणाल सुमन, साई नागपूरे, देवेंद्र लुटे, विशाल अर्जून यांच्या भूमिका आहेत.

IPL_Entry_Point