‘लिंबू कलरची साडी’ गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीय का? वाचाच...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘लिंबू कलरची साडी’ गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीय का? वाचाच...

‘लिंबू कलरची साडी’ गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीय का? वाचाच...

May 07, 2024 11:02 AM IST

अश्विनी भावे दिसल्या की, लिंबू कलरची साडी सहज आठवते. तीच लिंबू कलरची साडी गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांचा आज वाढदिवस आहे.

‘लिंबू कलरची साडी’ गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीय का? वाचाच...
‘लिंबू कलरची साडी’ गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीय का? वाचाच...

मराठी अभिनेत्री अश्विनी भावे यांचं नाव घेतलं की, डोळ्यासमोर येते ती लिंबू कलरची साडी. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटातलं ‘लिंबू कलरची साडी’ हे दृश्य आजही प्रेक्षकांच्या हृदयाजवळच आहे. आजही प्रेक्षकांवर या सीनची जादू पाहायला मिळते. हा सीन अभिनेत्री अश्विनी भावे आणि अभिनेते अशोक सराफ या जोडीवर चित्रित झाला होता. तेव्हापासून अश्विनी भावे दिसल्या की, लिंबू कलरची साडी सहज आठवते. तीच लिंबू कलरची साडी गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याबद्दलच्या काही खास गोष्टी...

'सैनिक', 'बंधन', 'जख्मी दिल', 'वजीर' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेल्या अश्विनी भावे ही ९० च्या दशकातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. अश्विनी भावे यांनी मोठ्या पडद्यावर प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अश्विनी यांनी आपल्या करिअरमध्ये ४०हून अधिक चित्रपट केले आहेत. मराठीच नव्हे तर त्यांचे हिंदी चित्रपट देखील खूप गाजले. विक्रम गोखले, सचिन, अशोक सराफ यांच्यासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली. ‘हिना’ या बॉलिवूड चित्रपटातूनही अभिनेत्रीला खूप प्रसिद्धी मिळाली. यामध्ये तिच्यासोबत ऋषी कपूर दिसले होते.

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

साऊथमध्येही केले काम!

चित्रपट केल्यानंतर अश्विनी भावे टीव्ही आणि मराठी इंडस्ट्रीकडे वळल्या. १९९३मध्ये त्यांनी ‘विष्णू विजय’ या कन्नड चित्रपटातही काम केले होते. त्याचे दिग्दर्शन केशू यांनी केले होते. दाक्षिणात्य अभिनेते डॉ.विष्णुवर्धन आणि अक्षय कुमार, आशुतोष राणा देखील या चित्रपटात झळकले होते. १९९७मध्ये अश्विनी भावेने ‘रंगेनहल्लीयेगे रंगडा रंगेगौडा’ नावाचा आणखी एक कन्नड चित्रपट केला, ज्यामध्ये डॉ. अंबरीश आणि रमेश अरविंद दिसले होते.

अमेरिकेतून केला फिल्म मेकिंगचा कोर्स!

अश्विनी भावे यांनी मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधून तत्त्वज्ञानाची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी ॲकॅडमी ऑफ आर्ट युनिव्हर्सिटी, सॅन फ्रान्सिस्कोमधून मोशन पिक्चर आणि टीव्हीमध्ये पदवी मिळवली. अश्विनी यांनी चित्रपट केल्यानंतर अमेरिकेत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी फिल्म मेकिंगचा कोर्स केला. याच काळात त्यांचे लग्नही झाले. २०१७मध्ये जेव्हा त्या परत भारतात आल्या, तेव्हा त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये पुन्हा नशीब आजमावले. अश्विनी भावे पडद्यापासून दूर असल्या, तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या इंस्टाग्रामवर भरपूर सक्रिय आहे. त्या नेहमीच त्यांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. एवढेच नाही तर अश्विनी अमेरिकेत राहून ऑर्गनिक शेतीही करते.

Whats_app_banner