मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 06, 2024 07:58 PM IST

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देखील प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. चला तर पाहूया काय काय होतंय रिलीज...

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज
रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

मे महिन्याच्या सुरूवातीस, काही धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाल्या आहेत. वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी हॉरर ते ॲक्शन आणि ड्रामा प्रकारातील चित्रपट सध्या उपलब्ध आहेत. आता या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देखील अशा प्रकारची मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. चला तर पाहूया काय काय होतंय रिलीज...

ट्रेंडिंग न्यूज

ऑल ऑफ अस स्ट्रेंजर्स

'ऑल ऑफ अस स्ट्रेंजर्स' हा एक ब्रिटिश चित्रपट आहे. ही कथा एका अशा माणसाची आहे, जो त्याच्या रहस्यमय शेजाऱ्याशी नाते संबंध निर्माण करतो. यानंतर त्याच्या भूतकाळातील काही आठवणी समोर येतात.

कुठे आणि कधी बघाल? : ८ मे, डिस्ने प्लस हॉटस्टार

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

द फायनल अटॅक ऑन वेम्ब्ले

‘द फायनल अटॅक ऑन वेम्ब्ले’ ही सीरिज फुटबॉल सामन्यावर आधारित आहे. या सीरिज कथा इंग्लंडने युरोपियन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या घटनेभोवती फिरणारी आहे.

कुठे आणि कधी बघाल? : ८ मे, नेटफ्लिक्स

मॅक्सटन हॉल

तुम्हाला रोमँटिक चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर तुमच्या वॉचलिस्टमध्ये 'रुबी' आणि 'जेम्स ब्यूफोर्ट'ची कथा नक्कीच समाविष्ट करा. मोना केस्टनच्या 'सेव्ह मी' या सर्वाधिक विक्री झालेल्या कादंबरीवर आधारित 'मॅक्सटन हॉल'ची कथा लव्ह-हेट रिलेशनशिपवर आधारित आहे.

कुठे आणि कधी बघाल? : ९ मे, प्राइम व्हिडीओ

अनदेखी

क्राइम जॉनरमधील 'अनदेखी' या सीरिजला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. त्यामुळेच या सीरिजचे पहिले दोन सीझन हिट झाल्यानंतर निर्माते तिसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ही कथा एक मर्डर मिस्ट्री आहे. पश्चिम बंगालच्या सुंदरबनमध्ये एका पोलिसाची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या गावातून फरार झालेल्या दोन आदिवासी मुलींवर हत्येचा संशय आहे. हे हत्येचे रहस्य पाहण्यासाठी तुम्हाला सीरिज पाहावी लागेल.

कुठे आणि कधी बघाल? : १० मे, सोनी लिव्ह

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

ब्लड ऑफ झ्यूस

नेटफ्लिक्सच्या हिट सिरीजमध्ये 'ब्लड ऑफ झ्यूस'चे नाव देखील सामील आहे. या शोचा दुसरा सीझन या आठवड्यापासून सुरू होत आहे.

कुठे आणि कधी बघाल? : १० मे, नेटफ्लिक्स

डॉक्टर हू

'डॉक्टर हू' हा एक असा चित्रपट आहे, ज्यात एक डॉक्टर त्याच्या मित्रांसोबत अंतराळात प्रवास करतो. या काळात तो अनेक नवीन मित्र बनवतो. 'डॉक्टर हू' हा एक विज्ञानकथा चित्रपट आहे.

कुठे आणि कधी बघाल? : ११ मे, डिस्ने प्लस हॉटस्टार

IPL_Entry_Point

विभाग