मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shahrukh Khan: एका ८० वर्षाच्या महिला फॅनच्या छोट्या वाक्यानं बदललं होतं शाहरुखचं संपूर्ण आयुष्य

Shahrukh Khan: एका ८० वर्षाच्या महिला फॅनच्या छोट्या वाक्यानं बदललं होतं शाहरुखचं संपूर्ण आयुष्य

Feb 17, 2023, 04:35 PM IST

    • ‘डर’, ‘बाजीगर’ सारख्या सिनेमांमध्ये प्रेयसीला मार-धाड, खून करणारा शाहरुख खान रुपेरी पडद्यावरचा सर्वाधिक लोकप्रिय लव्हर ब्वॉय कसा बनला याचा एक मजेदार किस्सा प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी शेअर केला आहे. (Shahrukh Khan initially denied offer of DDLJ movie)
How Shahrukh Khan accepted offer of popular movie DDLJ

‘डर’, ‘बाजीगर’ सारख्या सिनेमांमध्ये प्रेयसीला मार-धाड, खून करणारा शाहरुख खान रुपेरी पडद्यावरचा सर्वाधिक लोकप्रिय लव्हर ब्वॉय कसा बनला याचा एक मजेदार किस्सा प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी शेअर केला आहे. (Shahrukh Khan initially denied offer of DDLJ movie)

    • ‘डर’, ‘बाजीगर’ सारख्या सिनेमांमध्ये प्रेयसीला मार-धाड, खून करणारा शाहरुख खान रुपेरी पडद्यावरचा सर्वाधिक लोकप्रिय लव्हर ब्वॉय कसा बनला याचा एक मजेदार किस्सा प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी शेअर केला आहे. (Shahrukh Khan initially denied offer of DDLJ movie)

शाहरुख खानचा ‘पठाण’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. ५७ वर्षाच्या शाहरुखने ‘पठाण’मध्ये वठवलेल्या भारतीय गुप्तहेराच्या भूमिकेने जगभरातील चाहत्यांना भुरळ पाडली आहे. सिनेमातील मार धाडीच्या दृष्यांसोबतच शाहरुख-दीपिकादरम्यानचं प्रेम, प्रणय आणि प्रेक्षणीय ठिकाणांवर केलेलं नृत्य प्रेक्षक डोक्यावर घेत आहेत. रुपेरी पडद्यावर आपल्या लव्हर ब्वॉय प्रतिमेला शाहरुख खानने याही सिनेमात जपलं आहे. परंतु एकेकाळी ‘डर’, ‘बाजीगर’ सारख्या सिनेमांमध्ये प्रेयसीला मार-धाड, खून करणारा शाहरुख खान रुपेरी पडद्यावरचा सर्वाधिक लोकप्रिय लव्हर ब्वॉय कसा बनला याचा एक मजेदार किस्सा नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रोमँटिक्स’ या डॉक्युमेंटरीमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी शेअर केला आहे. शाहरुख खान हा नव्वदच्या दशकात पडद्यावर अॅक्शन प्रकारातील भूमिकांमध्ये चांगलाच रमलेला असताना आदित्य चोप्रा यांनी मोठ्या प्रयत्नाने त्याचं मन वळवून ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमा करण्यासाठी कसं भाग पाडलं, यासाठी शाहरुखच्या घरी त्यांना किती चकरा माराव्या लागल्या याची रंजक कहाणी चोप्रा यांनी सांगितली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘लिंबू कलरची साडी’ गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीय का? वाचाच...

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

आदित्य चोप्रा म्हणाले, ‘शाहरुख खानची भूमिका असलेला ‘डर’ सिनेमा माझ्या वडिलांनी, यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. त्यावेळी सहायक दिग्दर्शक म्हणून मी करत होतो. त्यावेळी शाहरुख खानचा माझा जवळून परिचय झाला. त्याला मारधाडीचे सिनेमे करण्यातच अधिक रस असल्याने सेटवर आम्ही बहुतांश अॅक्शन सिनेमांबद्दलच बोलायचो. परंतु मी त्याच्या डोळ्यांत एक वेगळ्या प्रकारची चमक पाहत होतो. मला शाहरुख हा सौम्य प्रकृतीचा, छान स्वभावाचा मुलगा वाटत होता. आणि पुढे त्यालाच नजरेसमोर ठेवून मी ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ची पटकथा लिहिली होती.

‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’च्या ऑफरबाबत शाहरुख खान म्हणाला, ‘आदित्य चोप्राने मला त्याच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सिनेमाची कथा जेव्हा पहिल्यांदा ऐकवली तेव्हा मला धक्काच बसला. काय बोलावं कळत नव्हतं. आदित्य नेहमी माझ्यासोबत अॅक्शन सिनेमांबद्दल बोलायचा. पण इथं त्याने प्रेयसीसोबत बागडणारा, नाचणाऱ्या रोमँटिक तरुणाचं पात्र रंगवलं होतं. मी रोमँटिक पात्राला न्याय देऊ शकेल, असं वाटत नव्हतं. माझ्या लाजाळू स्वभावामुळे मी आदित्यला थेट नकारही देऊ शकत नव्हतो. माझी अवस्था बिकट झाली होती.’

‘त्रिमुर्ती’च्या सेटवर म्हातारीच्या वाक्याने बदललं शाहरुखचं आयुष्य

‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ची पटकथा ऐकवल्यानंतर दिग्दर्शक आदित्य चोप्रा सलग दोन महिने शाहरुख खानचा पाठलाग करत होते. या सिनेमाला नकार देऊ नकोस, असं सांगत होते. आदित्य चोप्रा म्हणाले, ‘मी सलग दोन महिने शाहरुखला विविध सेटवर जाऊन भेटायचो. तुला रोमँटिक लव्हर ब्वॉयचं पात्र करायचं नसेल तर नको करू. पण लव्ह स्टोरीसाठीची दारं बंद करू नकोस, असं समजावत होतो. एकदा शाहरुख खान ‘त्रिमुर्ती’ सिनेमाचं शुटिंग करत असताना सेटवर मी त्याला जाऊन भेटलो. सेटवर चाहत्यांनी त्याला गराडा घातला होता. काहीजण ऑटोग्राफ घेत होते. त्यात एक ऐंशी वर्षाची वृद्ध महिला शाहरुखजवळ आली आणि म्हणाली, ‘बेटा तू बहोत अच्छा है. इतना अच्छा काम करता है… मुझे बहुत पसंत आता है… पर तू हर फिल्म मे मरता है... और हर फिल्म में तेरा खून होता है, वह मुझे अच्छा नही लगता…’ त्यानंतर मी शाहरुखला सांगितलं की देशात पडद्यावर जो असं पात्र रंगवतो ज्यात प्रत्येक मातेला आपला मुलगा, बहिणीला आपला भाऊ आणि कॉलेज तरुणीला आपला प्रियकर दिसतो तोच सुपरस्टार ठरतो. यानंतर थोड्या दिवसातच शाहरुख खानचा मला मॅसेज आला आणि त्याने ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ साठी मला होकार कळवला होता, अशी आठवण आदित्य चोप्रा यांनी सांगितली.

१९९४ साली आलेला शाहरुख - काजोलचा ‘दिलवाले दुल्हनियां..’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. सिनेमाने अनेक विक्रम स्थापित केले. शिवाय शाहरुख खानच्या कारकिर्दीला वळण देणाऱ्या या सिनेमाने त्याला ग्लोबल सुपरस्टार म्हणून स्थापित केलं होतं.

विभाग