मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shahrukh Khan: WhatsApp नंबर मागणाऱ्या चाहतीला शाहरुख खानचे भन्नाट उत्तर, म्हणाला...

Shahrukh Khan: WhatsApp नंबर मागणाऱ्या चाहतीला शाहरुख खानचे भन्नाट उत्तर, म्हणाला...

Aarti Vilas Borade HT Marathi

Dec 18, 2022, 11:18 AM IST

    • Shahrukh Khan: शाहरुखने नेहमीप्रमाणे ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
शाहरुख खान (PTI)

Shahrukh Khan: शाहरुखने नेहमीप्रमाणे ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

    • Shahrukh Khan: शाहरुखने नेहमीप्रमाणे ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या त्याचा आगामी चित्रपट 'पठाण'मुळे चर्चेत आहे. एकीकडे चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत तर दुसरीकडे काहींनी चित्रपटाला विरोध केला आहे. अशातच शाहरुखने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. त्याने नेहमीप्रमाणे ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

एका यूजरने शाहरुखला ‘तू तुझा WhatsApp नंबर देऊ शकतोस का? तुमच्याशी बोलून झाल्यानंतर मी पुन्हा तो नंबर डिलित करेन’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर शाहरुखने ‘मी फोन आणि मेसेजवर फारसा बोलत नाही’ असे उत्तर दिले.

दरम्यान, शाहरुखला आणखी काही प्रश्न विचारण्यात आले होते.

प्रश्न: सलमान खानचा तुझा सर्वांत आवडता चित्रपट?
उत्तर: बजरंगी भाईजान

प्रश्न: तू स्वदेश, चक दे इंडिया यांसारखे चित्रपट का बनवत नाहीस?
उत्तर: बनवले तर आहेत, आता आणखी किती बनवू?

प्रश्न: तुझ्यासाठी या विश्वाचा अर्थ काय आहे?
उत्तर: माझी मुलं

कामाविषयी बोलायचे झाले तर शाहरुख झीरो या चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. आता त्याचा 'पठाण' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका सोबत जॉन इब्राहिम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच नुकताच प्रदर्शित झालेले 'बेशरम रंग' हे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या गाण्याचा सोशल मीडियावर ट्रेंड देखील पाहायला मिळाला. आता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

विभाग

पुढील बातम्या