मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shahrukh Khan: सिनेमा कसा बनतो?; 'अमर अकबर अँथनी'चं उदाहरण देत शाहरुखनं सांगितलं!

Shahrukh Khan: सिनेमा कसा बनतो?; 'अमर अकबर अँथनी'चं उदाहरण देत शाहरुखनं सांगितलं!

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 31, 2023, 03:25 PM IST

    • Pathaan: ‘पठाण’ चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी शाहरुखने सोमवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत त्याने सिनेमा कसा बनतो हे सांगितले आहे.
शाहरुख खान (AP)

Pathaan: ‘पठाण’ चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी शाहरुखने सोमवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत त्याने सिनेमा कसा बनतो हे सांगितले आहे.

    • Pathaan: ‘पठाण’ चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी शाहरुखने सोमवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत त्याने सिनेमा कसा बनतो हे सांगितले आहे.

सुपरस्टार शाहरुख खान सध्या प्रचंड चर्चेत आहे आणि यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचा 'पठाण' चित्रपट. 'पठाण'ने रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रिलीजच्या अवघ्या ५ दिवसांतच या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘पठाण’ चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी शाहरुखने सोमवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत त्याने सिनेमा कसा बनतो हे सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखने 'अमर अकबर अँथनी' चित्रपटाचे उदाहरण दिले आहे. 'ही दीपिका पादूकोण जी अमर आहे, मी शाहरुख जो अकबर आहे आणि हा जॉन आहे जो अँथनी आहे. असा सिनेमा नेहमी बनतो. अमर, अकबर अँथनी यांच्यात कोणत्याही धर्मावरुन, वर्णावरुन भेदभाव नाही. आमचे तुमच्या सर्वांवर प्रचंड प्रेम आहे. आम्हाला प्रेमाची भूक आहे. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही आमच्यावर करा' असे शाहरुख म्हणाला.
वाचा: शाहरुख खानने स्टेजवरच केलं जॉन अब्राहमला किस! म्हणाला ‘हा तर मला रोजच...’

पुढे शाहरुखने प्रेक्षकांचे आभार मानात, 'चित्रपटाने कितीही कोटी रुपये कमावू देत. पण आम्हाला चित्रपट पाहिल्यावर जे प्रेम मिळतय त्यापेक्षा मोठे कोणतेही बक्षिस नाही. तुमच्या सगळ्यांचे आभार. आपल्याला आपली संस्कृती, आपला इतिहास हा आपल्याला लोकांपर्यंत वेगवेगळ्या रुपात पोहोचवायचा आहे' असे म्हटले.

‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शाहरुखचा हा चित्रपट दर दिवशी तब्बल १०० कोटींची कमाई करत आहे. ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

विभाग

पुढील बातम्या