मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan : शाहरुख खानने स्टेजवरच केलं जॉन अब्राहमला किस! म्हणाला ‘हा तर मला रोजच...’

Pathaan : शाहरुख खानने स्टेजवरच केलं जॉन अब्राहमला किस! म्हणाला ‘हा तर मला रोजच...’

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 31, 2023 11:22 AM IST

Shah Rukh Khan Kissed John Abraham : शाहरुख खानचे कौतुक करताना शाहरुख हा भारतातील सर्वात मोठा अॅक्शन हिरो असल्याचे जॉन अब्राहम याने म्हटले आहे.

Shahr Rukh Khan-John Abraham
Shahr Rukh Khan-John Abraham

Shah Rukh Khan Kissed John Abraham : सुपरस्टार शाहरुख खान सध्या प्रचंड चर्चेत आहे आणि यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचा 'पठाण' चित्रपट. 'पठाण'ने रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रिलीजच्या अवघ्या ५ दिवसांतच या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘पठाण’ चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी शाहरुखने सोमवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये त्याने जॉनच्या गालावर किस केले.

या कार्यक्रमात शाहरुख, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसह 'पठाण'ची संपूर्ण स्टार कास्ट देखील मंचावर उपस्थित होती. यावेळी सगळ्यांनीच मीडियाशी संवाद साधला. दरम्यान, शाहरुखने जॉन अब्राहमच्या गालावर किस केले. यावेळी जॉन अब्राहमने देखील शाहरुख खानचे तोंड भरून कौतुक केले. गेल्या अनेक दिवसांपासून जॉन आणि शाहरुख खान यांच्यात वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, यावेळी दोघांनी आपल्यातील मैत्रीचा पुरावा देत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शाहरुख म्हणाला की, ‘मी जॉनला पहिल्यांदाच किस करत आहे. पण त्याने मला चित्रपटादरम्यान अनेकदा किस केले आहे.’

यावेळी शाहरुख खानचे कौतुक करताना शाहरुख हा भारतातील सर्वात मोठा अॅक्शन हिरो असल्याचे जॉन अब्राहम याने म्हटले आहे. चित्रपटातील काही दृश्यांचे शूटिंग झाल्यानंतर तोच शाहरुखला किस करत असल्याचे देखील जॉनने सांगितले आहे. ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. जॉन अब्राहम या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. या पत्रकार परिषदेत जॉनने शाहरुखचे कौतुक केले आणि आदित्य चोप्राचे आभार देखील मानले.

‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शाहरुखचा हा चित्रपट दर दिवशी तब्बल १०० कोटींची कमाई करत आहे. ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

IPL_Entry_Point