मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Samir Choughule Birthday: महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या समीर चौगुले यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

Samir Choughule Birthday: महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या समीर चौगुले यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

May 29, 2023, 07:54 AM IST

  • Happy Birthday Samir Choughule: परफेक्ट कॉमिक टायमिंग आणि लेखनामुळे समीर चौगुले प्रचंड प्रसिद्ध आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शो मधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

Samir Choughule

Happy Birthday Samir Choughule: परफेक्ट कॉमिक टायमिंग आणि लेखनामुळे समीर चौगुले प्रचंड प्रसिद्ध आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शो मधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

  • Happy Birthday Samir Choughule: परफेक्ट कॉमिक टायमिंग आणि लेखनामुळे समीर चौगुले प्रचंड प्रसिद्ध आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शो मधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

Happy Birthday Samir Choughule:महाराष्ट्राची हास्यजत्रा’ वा एखादा मराठी चित्रपट, आपल्या विनोदी अभिनयाने अवघ्या रसिकजनांना पोट धरून हसायला लावणारे ‘विनोदवीर’ अभिनेते समीर चौगुले यांचा आज वाढदिवस आहे. २९ जून १९७३ रोजी समीर चौगुले यांचा जन्म मुंबईतच झाला. परफेक्ट कॉमिक टायमिंग आणि लेखनामुळे समीर चौगुले प्रचंड प्रसिद्ध आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शो मधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अभिनेते समीर चौगुले यांनी एम.एल.धानोरकर महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असून, वाणिज्य शाखेतून आपली पदवी मिळवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सरगमची अट मान्य करून अक्षरा तिला घरात घेऊन येईल का? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार ट्वीस्ट

सायली देवासमोर खोटी शपथ घेणार की लग्नाचं सत्य कबुल करणार? ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर!

Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक! गुन्हेगारांची केली होती मदत

‘लिंबू कलरची साडी’ गाजवणाऱ्या अश्विनी भावे यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी माहितीय का? वाचाच...

समीर चौगुले यांना लहानपणी अभिनयाची नसली तरी खेळाची प्रचंड आवड होती. शाळेतील प्रत्येक क्रीडा महोत्सवात ते सहभागी व्हायचे. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील त्यांना सहभागी व्हावे लागत होते. इथूनच त्यांना अभिनयाची गोडी निर्माण झाली. त्यानंतर समीर यांनी लिखाण कामही सुरू केलं. २००५मध्ये समीर यांना पहिलावहिला मोठा प्रोजेक्ट मिळाला. या आधीही ते मनोरंजन विश्वात सक्रिय होते. काही छोट्या छोट्या भूमिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र, २००५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कायद्याचं बोला’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली.

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध आणि वीणा करणार आशुतोषच्या ऑफिसमधून काम, काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?

केवळ टीव्हीच नव्हे, तर समीर चौगुले यांनी आपल्या अभिनयाने मोठा पडदा देखील गाजवला आहे. ‘मुंबई मेरी जान’, ‘आजचा दिवस माझा’, ‘वक्रतुंड महाकाय’, ‘अ पेईंग घोस्ट’, ‘मुंबई टाईम’, ‘विकून टाक’ अशा चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत. ‘टिकल ते पॉलिटिकल’, ‘आंबट-गोड’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘कॉमेडीची बुलेट’, ‘कुंकू’, ‘आज के श्रीमान श्रीमती’, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अशा मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तर, समीर चौगुले यांनी रंगमंच देखील गाजवला आहे. ‘असा मी असामी’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘यदाकदाचित’, ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’, ‘श्री बाई समर्थ’, ‘कॅरिऑन हेवन्स’, ‘बेस्ट ऑफ बॉटम्स अप’ अशा काही नाटकांमधून देखील काम केलं आहे.

समीर चौगुले यांचा कॉमेडी टायमिंग जितका चांगला आहे, तितकेच ते एक चांगले मिमिक्री आर्टिस्ट देखील आहेत. एखाद्या माणसाचा, पक्षाचा, प्राण्यांचा आवाज काढताना आपण अनेकांना पाहिलं असेल, पण समीर चौगुले विविध वस्तूंचा, डिजिटल गोष्टींचा आवाज काढण्यात माहीर आहेत.