मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध आणि वीणा करणार आशुतोषच्या ऑफिसमधून काम, काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्ध आणि वीणा करणार आशुतोषच्या ऑफिसमधून काम, काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?

Aarti Vilas Borade HT Marathi
May 28, 2023 01:26 PM IST

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial update: 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. वीणाच्या एण्ट्रीने मालिकेच्या कथानकाने वेगळे वळण घेतले आहे.

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. मालिकेत आशुतोषची बहिण वीणाची एण्ट्री होताच मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. वीणा आणि अनिरुद्ध हे एकत्र काम करत असतात. त्यामुळे मालिकेत आता रंजक वळण आले आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये वीणा ही आशुतोष आणि नितीनसोबत सकाळचा नाश्ता करत असते. तेवढ्याच अनिरुद्ध त्यांच्या घरी पोहोचतो. त्यानंतर ते दोघे त्यांच्या ऑफिससाठी नवी जागा शोधत असल्याचे कळते. तेवढ्यात अनिरुद्ध वीणाला पुढचे काही महिने आपण आशुतोषच्या ऑफिसमधून काम करु असते म्हणतो.

ते ऐकून वीणा खूश होते आणि आशुतोषकडे विनंती करते. आशुतोषपण लगेच तयार होता. नितीन मात्र आशुतोषला थांबवण्याचा प्रयत्न करतो. कारण अरुंधतीला हे आवडणार नाही असे त्याला वाटते. पण आशुतोष सगळ्याला होकार देतो. आता अरुंधतीला कळाल्यावर तिची प्रतिक्रिया काय असणार? अरुंधती ऑफिसला जाणे बंद करणार का? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point

विभाग