मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार प्रेक्षकांचा निरोप

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार प्रेक्षकांचा निरोप

Aarti Vilas Borade HT Marathi
May 23, 2023 03:27 PM IST

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या जागी एक नवा कार्यक्रम सुरु होणार आहे. जाणून घ्या कोणता...

Maharashtrachi Hasyajatra
Maharashtrachi Hasyajatra

महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ओळखला जातो. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमानी रसिकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत हा कार्यक्रम पाहिला जात असून रसिक मायबाप या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत आहेत. पण आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील प्रियदर्शनी इंदलकर, रसिरा वेंगुर्लेकर आणि गौरव मोरे या कलाकारांनी सोशल मीडियावर शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर केले आहेत. सेटवरचा फोटो शेअर करत प्रियदर्शनीने लिहिले आहे की, "दोन महिन्यांनंतर भेटू." तर रसिका वेंगुर्लेकरने 'शेवटच्या शेड्युलचा शेवटचा दिवस... या माझ्या अतरंगी मित्रांबरोबरचे शेवटचे काही क्षण' अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक व्यक्तिरेखा रसिकांना त्यांच्या घरातली वाटते. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सगळेच कलाकार आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भरभरून हसवतात. टेन्शन विसरण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी भाग पडतात. मात्र, आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाची जागा आता 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम घेणार आहे. २९ मे पासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमाचा नुकताच प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोवरुन हा कार्यक्रम २९ मे पासून सुरु होत असल्याचे दिसत आहे.

IPL_Entry_Point