मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story :‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन रुग्णालयात दाखल, काय झालं नेमकं?

The Kerala Story :‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन रुग्णालयात दाखल, काय झालं नेमकं?

Aarti Vilas Borade HT Marathi
May 28, 2023 08:55 AM IST

The Kerala Story: एकीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे तर दुसरीकडे चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना रुग्णालयाक दाखल करण्यात आले आहे.

Sudipto Sen
Sudipto Sen

अभिनेत्री अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे तर काही ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. चित्रपटात केरळच्या तीन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यांचे धर्मांतर केले जाते. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सुदीप्तो सेन यांची प्रकृती खालावली आहे. ते सतत प्रवास करत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रमोशन सध्या थांबवण्यात आले आहे. सुदीप्तो सेन यांची तब्येत बरी झाल्यानंतर ते10 शहरांमध्ये ‘द केरळ स्टोरी’चा प्रचार करण्याची योजना आखत आहेत.
वाचा: कधीकाळी ५० रुपये कमावणाऱ्या दिलीप जोशींना ‘तारक मेहता’ शो मिळाला अन् नशीबच पालटलं!

सध्या सुदीप्तो सेन हे वेगवेगळ्या शहरात जाऊन त्यांच्या चित्रपटाविषयी बोलत आहेत. लोकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सुदीप्तो यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. मात्र, प्रदर्शनानंतर चित्रपटातील अनेक गोष्टी खऱ्या असल्याचे समोर आले.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील ३२००० हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे ब्रेनवॉश करण्यात आले. यानंतर त्यांना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांना सीरियाला पाठवण्यात आले, जिथे त्यांच्यासोबत धक्कादायक घटना घडल्या. ‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. यात अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासोबत योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग