मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dilip Joshi Birthday: कधीकाळी ५० रुपये कमावणाऱ्या दिलीप जोशींना ‘तारक मेहता’ शो मिळाला अन् नशीबच पालटलं! वाचा...
Dilip Joshi
Dilip Joshi

Dilip Joshi Birthday: कधीकाळी ५० रुपये कमावणाऱ्या दिलीप जोशींना ‘तारक मेहता’ शो मिळाला अन् नशीबच पालटलं! वाचा...

26 May 2023, 7:34 ISTHarshada Bhirvandekar

Happy Birthday Dilip Joshi: पोरबंदरच्या ग्रामीण भागात जन्मलेल्या दिलीप जोशी यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली होती.

Happy Birthday Dilip Joshi: छोटा पडदा गाजवणाऱ्या अभिनेता दिलीप जोशी यांना लोक ‘जेठालाल’ या नावानेच ओळखतात. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दीर्घकाळ काम करून 'जेठालाल चंपकलाल गाडा' या नावाने घरोघरी प्रसिद्ध झालेल्या दिलीप जोशी यांचा जन्म २६ मे १९६८ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. दिलीप यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कॉमेडी मालिकेतून तुफान प्रसिद्धी मिळाली आहे. एका दशकाहून अधिक काळ चालणारा हा कॉमेडी शो काळानुसार अधिक लोकप्रिय होत आहे. यातील कलाकारांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिलीप जोशी हे आज प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेते आहेत. टीव्हीशिवाय त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. आजघडीला दिलीप जोशी यांच्याकडे पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी आहेत. मात्र, काही वर्षापूर्वी त्यांचे आयुष्य असे नव्हते. आता एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेणारे दिलीप जोशी त्याकाळी पडेल ते काम करायला तयार होते.

Ashish Vidyarthi Wedding: वयाच्या ६०व्या वर्षी आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोरबंदरच्या ग्रामीण भागात जन्मलेल्या दिलीप जोशी यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. यासाठी त्यांना रोज फक्त ५० रुपये मिळत होते. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर दिलीप जोशी जेव्हा मुंबईत पोहोचले, तेव्हा त्यांनी काम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. १९८९मध्ये सलमान खान आणि भाग्यश्री स्टारर फिल्म ‘मैंने प्यार किया’ मधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी रामू नावाच्या पात्राची छोटीशी भूमिका साकारली होती.

दिलीप जोशी यांना या चित्रपटानंतर काम मिळू लागले. 'हमराज', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'खिलाडी ४२०' सारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले. यादरम्यान ते टीव्ही शोमध्येही नशीब आजमावत राहिले. पण दिलीप जोशींना खरी ओळख मिळाली ती २००८मध्ये सुरू झालेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' यामालिकेमध्ये ‘जेठालाल’ ही भूमिका साकारल्यामुळेच! या मालिकेने त्यांचे नशीबच पालटले. दिलीप जोशी हे या शोचे सर्वात लाडके कलाकार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलीप जोशी ‘जेठालाल’ची भूमिका साकारण्यासाठी प्रति एपिसोड १.५ ते २ लाख रुपये घेतात. दिलीप यांची एकूण संपत्ती २० कोटींहून अधिक आहे.