मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gadar 2: प्रजासत्ताक दिनी सनी देओलकडून चाहत्यांना सरप्राईज; ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘गदर २’!

Gadar 2: प्रजासत्ताक दिनी सनी देओलकडून चाहत्यांना सरप्राईज; ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘गदर २’!

Jan 26, 2023, 03:04 PM IST

    • Gadar 2 release date announce: सनी देओलने सोशल मीडियावर 'गदर २'चे पोस्टर शेअर करून रिलीज डेटची घोषणा केली आहे.
Gadar 2

Gadar 2 release date announce: सनी देओलने सोशल मीडियावर 'गदर २'चे पोस्टर शेअर करून रिलीज डेटची घोषणा केली आहे.

    • Gadar 2 release date announce: सनी देओलने सोशल मीडियावर 'गदर २'चे पोस्टर शेअर करून रिलीज डेटची घोषणा केली आहे.

Gadar 2 release date announce: बॉलिवूड अभिनेता सनी देओल याच्या 'गदर २' या चित्रपटाची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या सिक्वेल्ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत राहिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची कोणतीही अपडेट समोर आली नव्हतो. मात्र, प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधत सनी देओलने त्याच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. निर्मात्यांनी ‘गदर २’ या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज करून त्याची रिलीज डेट जाहीर केली आहे. सनी देओलला तारा सिंहच्या अवतारात पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

सनी देओलने सोशल मीडियावर 'गदर २'चे पोस्टर शेअर करून रिलीज डेटची घोषणा केली आहे. सनी 'गदर'मध्ये हँडपंप उखडताना दिसला होता, यावेळी तो हातात हातोडा घेऊन दिसत आहे. पोस्टरमध्ये सनी तारा सिंहच्या अवतारात डोळ्यात राग, हातात हातोडा आणि हिरव्या पगडीसह काळ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. पोस्टर पाहूनच सनी 'गदर २' घेऊन पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ करणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

पोस्टर शेअर करताना सनी देओलने लिहिले की, 'हिंदुस्तान जिंदाबाद है... जिंदाबाद था... और जिंदाबाद रहेगा! या स्वातंत्र्यदिनी आम्ही तुमच्यासाठी दोन दशकांनंतर एका सिनेमाचा सर्वात मोठा सिक्वेल घेऊन येत आहोत. गदर २, येत्या ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात.’ यासोबतच सनी देओलनेही सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट २००१मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात सनी देओलसोबत अमिषा पटेल आणि अमरीश पुरी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता चाहते 'गदर २'चीही आतुरतेने वाट पाहत आहेत.

विभाग