मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sunny Deol: चित्रपट अर्ध्यात सोडला, पैसेही परत करण्यासही नकार! दिग्दर्शकाचे सनी देओलवर गंभीर आरोप

Sunny Deol: चित्रपट अर्ध्यात सोडला, पैसेही परत करण्यासही नकार! दिग्दर्शकाचे सनी देओलवर गंभीर आरोप

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 23, 2022 01:38 PM IST

Sunny Deol: नुकत्याच एका मुलाखतीत निर्माते-दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सनी देओलवर अनेक आरोप केले आहेत. सनी देओलने आपली फसवणूक केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Suneel And Sunny
Suneel And Sunny

Sunny Deol: सध्या मनोरंजन विश्वापासून दूर असला, तरी अभिनेता सनी देओल काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतो. अभिनेता आता त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे प्रसिद्धी झोतात आला आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते सुनील दर्शन (Suneel Darshan) यांनी अभिनेता सनी देओल त्याच्यावर पैसे लाटल्याचा आरोप केला आहे. कधी काळी सुनील दर्शन आणि अभिनेता सनी देओल ही बॉलिवूडची सुपरहिट जोडी ठरली होती. दोघांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले होते.

नुकत्याच एका मुलाखतीत निर्माते-दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी सनी देओलवर अनेक आरोप केले आहेत. सनी देओलने आपली फसवणूक केल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक चित्रपट अर्ध्यावरच सोडून, त्याने पैसे देखील परत करण्यास नकार दिल्याचे सुनील यांनी म्हटले आहे. सुरुवातीला अनेक हिट चित्रपट देणाऱ्या या जोडीत काही वाद झाले. यानंतर त्यांनी एकही चित्रपट एकत्र केला नाही. हा वाद गेल्या २६ वर्षांपासून सुरु आहे.

चित्रपट निर्माते सुनील दर्शन आणि अभिनेता सनी देओल गेल्या २६ वर्षांपासून ही कायदेशीर लढाई लढत आहेत. १९९६ दरम्यान आलेल्या 'अजय' चित्रपटापासून हा वाद सुरू झाला आहे. या प्रकरणी आरोप करताना सुनील दर्शन म्हणाले की, हा चित्रपट अर्ध्यावर सोडल्यानंतर सनी देओल याने पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नंतर आपल्याकडे पैसे नाहीत, असे म्हणत त्याने हात वर केले. यावेळी सनी देओल अहंकारी असल्याचे देखील सुनील दर्शन यांनी म्हटले आहे.

सुनील दर्शन यांनी ‘इंतकाम’, ‘लुटेरे’ आणि ‘अजय’ या सारखे चित्रपट तयार केले, ज्यात सनी देओल मुख्य भूमिकेत झळकला होता. मात्र, ‘अजय’ प्रदर्शित झाल्यापासून दोघांमध्ये वाद सुरु झाले होते, जे आजतागायात सुरू आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा जुना वाद पुन्हा एकदा उकरून काढला आहे.

IPL_Entry_Point

विभाग