मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16: ‘बिग बॉस १६’च्या घरात होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘ही’ व्यक्ती जाणार घराबाहेर!
Bigg Boss 16
Bigg Boss 16

Bigg Boss 16: ‘बिग बॉस १६’च्या घरात होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘ही’ व्यक्ती जाणार घराबाहेर!

26 January 2023, 14:18 ISTHarshada Bhirvandekar

Bigg Boss 16 Elimination : यावेळी टीना दत्ता, शालीन भानोत, प्रियंका चहर चौधरी आणि शिव ठाकरे यांना घरातून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करण्यात आले आहे.

Bigg Boss 16 Elimination : बिग बॉस १६चा खेळ आता अंतिम टप्प्याकडे सुरू झाला आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा एलिमिनेशनची वेळ आली आहे. यावेळी टीना दत्ता, शालीन भानोत, प्रियंका चहर चौधरी आणि शिव ठाकरे यांना घरातून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करण्यात आले आहे. या आठवड्यात शोमधून कोण एलिमिनेट होऊ शकते त्याचे नाव समोर आले आहे. या स्पर्धकाला सर्वात कमी मते मिळाली असून, घराबाहेर जाण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मीडिया रिपोर्टनुसार, यावेळी शिव ठाकरे याला सर्वाधिक ३३ टक्के मते मिळाली आहेत आणि त्यामुळे तो या आठवड्यात सुरक्षित झाला आहे. तर, प्रियांका चहर चौधरी ३० टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसर्‍या क्रमांकावर शालीन भानोत यांला २५ टक्के मते मिळाली आणि जिला सर्वात कमी मते मिळाली ती स्पर्धक म्हणजे टीना दत्ता. याचा अर्थ टीव्हीची लोकप्रिय बहू टीना दत्ता या आठवड्यात शोमधून बाहेर पडणार आहे.

बिग बॉस १६च्या सुरुवातीस, टीना सर्वात मजबूत खेळाडू मानली जात होती. कारण ती छोट्या पडद्यावरचे एक परिचित नाव होती. असे असूनही, शालीनसोबतचा तिचा लव्ह अँगल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. गेल्या काही आठवड्यांपासून दोघांमध्ये सतत वाद होत आहेत. अशा परिस्थितीत टीना घराबाहेर गेल्यानंतर शालीन एकटा पडणार आहे.

मात्र, टीना एलिमिनेट होणार का? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. गेल्या आठवड्यात देखील टीनाला सर्वात कमी मते मिळाली होती. पण, तिला वाचवण्यासाठी सौंदर्या शर्माला घर बाहेर काढले गेले, असे म्हटले जात होते. शालीनसोबतच्या वादानंतर आता टीना प्रियांकासोबत खेळत असून, दोघींचा खेळ प्रेक्षकांना आवडतो आहे.