मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: ‘हर हर महादेव’ बंद पाडणारे आता कोणत्या बिळात लपून बसले? अमेय खोपकरांचा खोचक सवाल!
Ameya Khopkar
Ameya Khopkar

Pathaan: ‘हर हर महादेव’ बंद पाडणारे आता कोणत्या बिळात लपून बसले? अमेय खोपकरांचा खोचक सवाल!

26 January 2023, 13:00 ISTHarshada Bhirvandekar

Pathaan: मनसे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, यात त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.

Ameya Khopkar Post: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला आहे. मात्र, ‘पठाण’सारख्या बिग बजेट चित्रपटामुळे नुकत्याच रिलीज झालेल्या मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीयेत. बॉलिवूड चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांची अशी गळचेपी होत असल्याने मनसेने या विरोधात आवाज उठवला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, यात त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘हर हर महादेव’ वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावणारे आव्हाड आता कुठे गेले? ‘पठाण’ मुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नसताना आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत? , असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. एकीकडे ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना, दुसरीकडे नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सरला एक कोटी’ आणि ‘बांबू’ या चित्रपटांना थिएटर मिळेनासे झाले आहे.

‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा असल्याचे म्हणत ठाण्यातील काही प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन मारहाण केली होती. या घटनेनंतर अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले होते. अशावेळी पुढाकार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आता कुठे गेले आहेत? असा सवाल मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे.

या आधी देखील मल्टीप्लेक्सवाल्यांनी मराठी सिनेमाला स्क्रीन दिली नाही तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला होता. 'मल्टीप्लेक्स किंवा सिंगल स्क्रिन थिएटरनी एकाही मराठी चित्रपटाला स्क्रीन दिलेली नाही. थिएटर्स मिळत नाहीयेत. मी याचा निषेध करतो. जर का मल्टीप्लेक्सवाल्यांनी मराठी चित्रपटांना थिएटर्स आणि चांगली स्क्रीन दिली नाही तर मी त्यांना इशारा देतोय की महाराष्ट्रभर आंदोलन होईल. आम्ही बघून घेऊ की कसे मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाहीत’, असे त्यांनी म्हटले होते.