मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

May 05, 2024, 07:50 AM IST

  • एक काळ असा होता जेव्हा गुलशन कुमार यांनी एकट्याने चित्रपट संगीताचा चेहरामोहराच बदलून टाकला होता. त्यांच्या 'टी सीरीज' कंपनीच्या कॅसेट्सनी संगीत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात मदत केली.

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

एक काळ असा होता जेव्हा गुलशन कुमार यांनी एकट्याने चित्रपट संगीताचा चेहरामोहराच बदलून टाकला होता. त्यांच्या 'टी सीरीज' कंपनीच्या कॅसेट्सनी संगीत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात मदत केली.

  • एक काळ असा होता जेव्हा गुलशन कुमार यांनी एकट्याने चित्रपट संगीताचा चेहरामोहराच बदलून टाकला होता. त्यांच्या 'टी सीरीज' कंपनीच्या कॅसेट्सनी संगीत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात मदत केली.

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते आणि उद्योगपती गुलशन कुमार यांचा जन्म ५ मे १९५१ रोजी झाला होता. ते बॉलिवूडच्या अशा सेलिब्रिटींपैकी एक होते, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर विशेष दर्जा मिळवला होता. त्यांचा मुलगा भूषण कुमार हा एक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माता आहे. मात्र, एक काळ असा होता जेव्हा गुलशन कुमार यांनी एकट्याने चित्रपट संगीताचा चेहरामोहराच बदलून टाकला होता. त्यांच्या 'टी सीरीज' कंपनीच्या कॅसेट्सनी संगीत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात मदत केली. गुलशन कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

गुलशन कुमार यांचा जन्म ५ मे १९५१ रोजी दिल्लीतील पंजाबी अरोरा कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव गुलशन दुआ होते. गुलशन कुमार यांचे वडील दिल्लीच्या दर्यागंज मार्केटमध्ये फळांच्या रसाचे दुकान चालवत होते. या ज्यूस सेन्टरवर गुलशन कुमार देखील वडिलांना त्यांच्या कामात मदत करत असत. तिथून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचला. गुलशन कुमार यांच्या झीरोतून हिरो बनण्यापर्यंतच्या संघर्षाची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी हळूहळू भारतीय संगीत उद्योगात प्रवेश केला आणि ते खूप प्रसिद्ध होऊ लागले.

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

'टी-सीरिज'ची स्थापना!

गुलशन कुमार यांनी सोनू निगमसह अनेक गायकांना त्यांच्या करिअरमध्ये ब्रेक देऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. गुलशन कुमार यांनी सुपर कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती, जी भारतातील सर्वात मोठी संगीत कंपनी बनली. या म्युझिक कंपनीअंतर्गत त्यांनी 'टी-सीरिज'ची स्थापना केली. 'टी-सीरीज' ही आज हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी संगीत आणि चित्रपट निर्मिती कंपनी आहे.

दुर्दैवी अंत!

गुलशन कुमार हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच त्यांच्या सामाजिक कामांमुळेही चर्चेत होते. त्यांनी वैष्णोदेवी येथे भंडारा सुरू केला होता, ज्याद्वारे आजही तेथे येणाऱ्या भाविकांना व यात्रेकरूंना मोफत भोजन दिले जाते. पण, अतिशय उदार असलेल्या गुलशन कुमार यांचा मृत्यू अत्यंत क्लेशदायक होता. मुंबई अंडरवर्ल्डच्या लोकांनी त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. पण, गुलशन कुमार यांनी त्यांच्या मागण्यांना थेट नकार दिला. त्यामुळे १२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईतील एका मंदिराबाहेर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.

विभाग

पुढील बातम्या