मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 04, 2024 11:04 AM IST

‘सारेगमप लिटील चॅम्प’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली आर्या आंबेकर हिने नेहमीच आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांची मने जिंकून घेतली आहेत.

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!
सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

सुगम आणि शास्त्रीय गाण्यातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली गायिका आर्या आंबेकर, राजस्थानी गायकीचा ढंग देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे मामे खान आणि श्रोत्यांच्या काळजाची तार छेडणारे प्रख्यात सतार वादक पूरबियान चॅटर्जी यांना ऐकण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. येत्या ५ मे रोजी मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात आणि २२ मे रोजी बोरवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आर्या आंबेकरची यापूर्वी कधीही सादर न झालेली आगळ्या ढंगाची मैफल होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तर, ११ मे रोजी मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये कोक स्टुडिओ फेम गायक मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची जुगलबंदी रंगणार आहे. या कार्यक्रमातून राजस्थानी ठेका आणि बंगाली गोडव्याचे फ्युजन रसिकांना अनुभवता येणार आहे हिंदुस्थानातील कलावंतांचे कार्यक्रम जगभरात सादर करणारे अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी पॅराशेअर एंटरटेनमेंटचे संस्थापक हर्षद पराशरे यांनी या कार्यक्रमाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षकांना देखील हे रंगत अनुभवता येणार आहे. जर, तुम्हालाही या मैफिलीचा आस्वाद घ्यायचा असेल, आणि अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही ७७०९१५३१४९ / ७२०८६९९६३३ या क्रमांकावर संपर्क करू शकता.

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

गोड गळ्याची गायिका आर्या!

‘सारेगमप लिटील चॅम्प’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली आर्या आंबेकर हिने नेहमीच आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांची मने जिंकून घेतली आहेत. गायनासोबातच आता ती मनोरंजन विश्वात देखील सक्रिय झाली आहे. तिने आपल्या सुंदर अभिनयाने देखील प्रेक्षकांना मोहित केले आहे. मात्र, गायन क्षेत्रात तिचा दबदबा जास्त आहे. तिने आपल्या आवाजाने प्रेक्षकांचे कान नेहमीच तृप्त केले. तिची सगळीच गाणी नेहमीच प्रेक्षकांना खूप आवडली आहेत. मुळची नागपूरची असणारी आर्या आता संपूर्ण महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत झाली आहे. आपल्या सुमधूर आवाजाने आर्याने केवळ तरूणांचीच नाही, तर ज्येष्ठ मंडळींचीही मने जिंकली आहेत.

कोण आहे मामे खान?

मामे खान यांचा संघर्षाचा प्रवास अवघ्या जगाने पाहिला आहे. एकेकाळी लग्नसोहळ्यात आई-वडिलांसोबत गाणाऱ्या मामे खानची ओळख आज जगभर प्रसिद्ध आहे. फ्रान्समध्ये झालेल्या कान्स फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर उतरत या राजस्थानी गायकाने इतिहास रचला होता. मामे खान यांचे उत्कृष्ट गायन आणि साधेपणा सर्वश्रुत आहे. राजस्थानी गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी बॉलिवूडमध्येही अनेक गाणी गायली आहेत.

IPL_Entry_Point