मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 04, 2024 09:33 AM IST

‘हीरामंडी’ ही वेब सीरिज बनवताना निर्माते संजय लीला भन्साळी यांनी बजेटचा जराही विचार केला नाही. तर, ‘हीरामंडी’ प्रमाणेच इतर लोकप्रिय वेब सीरिजच्या चाहत्यांनी देखील सीरिज आणि सेटसोबतच कलाकारांच्या फीसाठी भरपूर पैसे खर्च केले आहेत.

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?
‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. आठ भागांच्या या सीरिजवर निर्मात्यांनी करोडो रुपये खर्च केले आहेत. तब्बल २०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेली ही आतापर्यंतची सर्वात महागडी वेब सीरिज आहे. पण, केवळ ‘हीरामंडी’च नाही, तर अशा अनेक उत्तम सीरिज येत्या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज बनवताना निर्माते संजय लीला भन्साळी यांनी बजेटचा जराही विचार केला नाही. तर, ‘हीरामंडी’ प्रमाणेच इतर लोकप्रिय वेब सीरिजच्या चाहत्यांनी देखील सीरिज आणि सेटसोबतच कलाकारांच्या फीसाठी भरपूर पैसे खर्च केले आहेत. चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

मिर्झापूर ३

अली फजल, पंकज त्रिपाठी स्टारर वेब सीरिज ‘मिर्झापूर ३’ची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. यावेळी ‘मिर्झापूर’ची कथा वेगळी असणार आहे. या सीरिजमध्ये नवीन कलाकारांची एन्ट्री पाहायला मिळणार आहे. यामुळे कथा आणखीनच प्रेक्षणीय बनणार आहे. प्रेक्षकांना या सीरिजचे आधीचे दोन्ही सीझन खूप आवडले आहेत. त्यामुळे आता १०० कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये बनत असलेल्या या सीरिजची सगळेच प्रतीक्षा करत आहोत.

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

पंचायत ३

जितेंद्र कुमार उर्फ जीतू भैया पुन्हा एकदा फुलेरा गावचा सचिव म्हणून परतणार आहे. पण, यावेळी सीरिजच्या कथानकामध्ये मोठा ट्विस्ट असणार आहे. नुकतीच या सीरिजच्या प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २८ मेपासून ‘पंचायत ३’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज पूर्वीपेक्षा अधिक इमोशनल कथानक घेऊन येणार आहे. या सीरिजसाठी निर्मात्यांना ८० कोटी रुपये खर्च केल्याचे म्हटले जात आहे.

सिटाडेल: हनी बनी

प्रियांका चोप्राच्या इंग्रजी सीरिजचे हिंदी रूपांतरण असलेल्या ‘सिटाडेल: हनी बनी’ या सीरिजमध्ये वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू दिसणार आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन राज-डीके यांनी केले आहे. त्यांनीच आधी समांथाच्या ‘फॅमिली मॅन’चे दिग्दर्शन केले होते. ‘सिटाडेल’ ही एक स्पाय थ्रिलर सीरिज असणार आहे. ही सीरिज बनवण्यासाठी निर्मात्यांनी जवळपास १२० कोटी रुपये खर्च केले असल्याचे म्हटले जात आहे.

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

गुल्लक ३

‘गुल्लक ३’ या एका सामान्य कुटुंबावर आधारित वेब सीरिजचा सर्वाधिक पसंतीच्या असणाऱ्या ‘टॉप १०’ यादीत समावेश करण्यात आला आहे. या सीरिज तिसऱ्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सीरिजचा प्रीमियर होईल. मीडिया रिपोर्टनुसार, या सीरिजवर निर्मात्यांनी आतापर्यंत सुमारे ५० कोटी रुपये खर्च केले आहेत.

कोटा फॅक्टरी ३

विद्यार्थी जीवनावर आधारित वेब सीरिज ‘कोटा फॅक्टरी’चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी ही सीरिज ३० ते ३५ कोटी रुपयांमध्ये बनवण्याचा निर्णय घेतला आहे. जीतू भैया या सीरिजमध्ये एक नवीन कथा घेऊन येताना दिसणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग