मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'धाकड' प्रमाणे 'पृथ्वीराज'ही ठरला 'चार दिन की चाँदनी'; पाचव्या दिवशी…

'धाकड' प्रमाणे 'पृथ्वीराज'ही ठरला 'चार दिन की चाँदनी'; पाचव्या दिवशी…

Payal Shekhar Naik HT Marathi

Jun 08, 2022, 10:15 AM IST

    • अक्षयच्या चित्रपटाची अवस्था अत्यंत वाईट असून प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे.
पृथ्वीराज

अक्षयच्या चित्रपटाची अवस्था अत्यंत वाईट असून प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

    • अक्षयच्या चित्रपटाची अवस्था अत्यंत वाईट असून प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा 'पृथ्वीराज' चित्रपटगृहात दणकून आपटताना दिसतोय. सुरुवातीचे तीन दिवस अक्षयच्या 'सम्राट पृथ्वीराज' ची अवस्था ठीक ठाक होती. मात्र सोमवारी चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून प्रेक्षकांना अभिनेत्री कंगना रणौतच्या 'धाकड' ची आठवण आली. अक्षयच्या चित्रपटाची अवस्था अत्यंत वाईट असून प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. सोमवारी चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता चित्रपटगृहांनी पाचव्या दिवशी चित्रपटाचे शो रद्द केल्याचं समोर आलं आहे. अशीच अवस्था कंगनाच्या 'धाकड' ची देखील झाली होती.

ट्रेंडिंग न्यूज

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

अक्षयच्या 'पृथ्वीराज' ला आयएमबीडी कडून ७. ८ रेटिंग मिळाली असली तरी प्रेक्षकांना मात्र हा चित्रपट फारसा आवडला नाहीये. ३ जून रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी १० कोटी ७० लाखांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी १२ कोटी तर तिसऱ्या दिवशी १६ कोटींची कमाई केली होती. मात्र सोमवारी हा चित्रपट फक्त ५ कोटीचं कमावू शकला. त्यामुळे ४ दिवसात चित्रपटाने फक्त ४४ कोटींची कमाई केली आहे. तर पाचव्या दिवशी बुकिंग न झाल्याने कित्येक ठिकाणी सिनेमागृह चालकांनी चित्रपटाचे शो रद्द केले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, सोमवार आणि मंगळवारी तिकिटांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे, त्यामुळे मंगळवारी चित्रपट केवळ ३ कोटींची कमाई करेल असा अंदाज बांधण्यात येतोय.

अशीच अवस्था कंगनाच्या 'धाकड' ची देखील झाली होती. तिकीट विक्री न झाल्याने चित्रपटगृहातून त्याचे शो रद्द करण्यात आले होते. त्यामुळे आता 'धाकड' आणि 'पृथ्वीराज' एकाच पारड्यात असल्याचं चित्र आहे.