मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  box office: कमल हासनच्या 'विक्रम' पुढे अक्षयचा 'पृथ्वीराज' फिका, जाणून घ्या कमाई

box office: कमल हासनच्या 'विक्रम' पुढे अक्षयचा 'पृथ्वीराज' फिका, जाणून घ्या कमाई

Payal Shekhar Naik HT Marathi

Jun 05, 2022, 05:01 PM IST

    • ३०० कोटींच्या मोठ्या बजेटने तयार झालेला 'सम्राट पृथ्वीराज' कमाईच्या बाबतीत प्रचंड मागे आहे.
पृथ्वीराज vs विक्रम

३०० कोटींच्या मोठ्या बजेटने तयार झालेला 'सम्राट पृथ्वीराज' कमाईच्या बाबतीत प्रचंड मागे आहे.

    • ३०० कोटींच्या मोठ्या बजेटने तयार झालेला 'सम्राट पृथ्वीराज' कमाईच्या बाबतीत प्रचंड मागे आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर यांचा मेगा बजेट 'पृथ्वीराज' ३ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. ३०० कोटींच्या मोठ्या बजेटने तयार झालेला 'सम्राट पृथ्वीराज' कमाईच्या बाबतीत प्रचंड मागे आहे. तर त्याच दिवशी प्रदर्शित झालेला दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांचा 'विक्रम' मात्र बॉक्स ऑफिसवर धडाक्यात सुरू आहे. त्यासोबतच अदिवी शेष याचा 'मेजर' चित्रपटही 'पृथ्वीराज' ला तगडी टक्कर देताना दिसतोय. त्यामुळे येत्या आठवड्यात तरी 'पृथ्वीराज' ५० कोटीचा आकडा पार करू शकेल का यात शंका आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

अक्षयच्या 'पृथ्वीराज' ने पहिल्या दिवशी ११ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली मात्र त्यातही चित्रपट १२. ५० कोटींची कमाई करू शकला. दोन्ही दिवसात चित्रपटाने केवळ २३ कोटींची कमाई केली. त्यामुळे पहिल्या वीकेंडला 'पृथ्वीराज' ५० कोटींचा आकडा पार करू शकेल का असा प्रश्न चाहत्यांनाही पडला आहे. चित्रपटाचं निर्मिती मूल्य ३०० कोटींचं असल्याने त्याने त्याच हिशोबाने कमाई करणं अपेक्षित होतं. चित्रपट युपी, राजस्थान, गुजरात या भागात जास्त पाहिला जातोय. त्यामुळे रविवारी चित्रपट १५ ते १६ कोटींची कमाई करू शकतो असं म्हंटल जातंय.

तर दुसरीकडे कमल हासन याच्या 'विक्रम' या तामिळ चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने ५८ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे हे आकडे पाहून सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं. दुसऱ्याच दिवशी 'विक्रम' १०० कोटींचा आकडा पार करेल असं मानलं जातंय. यापूर्वी अक्षयचे 'बच्चन पांडे' आणि 'बेल बॉटम' चित्रपट सुपरफ्लॉप ठरले आहेत.

पुढील बातम्या