मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  हा तर बाला आहे! 'पृथ्वीराज' चा ट्रेलर पाहून अक्षयवर बरसले नेटकरी

हा तर बाला आहे! 'पृथ्वीराज' चा ट्रेलर पाहून अक्षयवर बरसले नेटकरी

Payal Shekhar Naik HT Marathi

May 10, 2022, 04:04 PM IST

    • नेटकऱ्यांना 'पृथ्वीराज' चित्रपटातील अक्षय आणि 'हाउसफुल ४' चित्रपटातील अक्षय यांमध्ये कोणताही फरक दिसेनासा झाला.
अक्षय कुमार

नेटकऱ्यांना 'पृथ्वीराज' चित्रपटातील अक्षय आणि 'हाउसफुल ४' चित्रपटातील अक्षय यांमध्ये कोणताही फरक दिसेनासा झाला.

    • नेटकऱ्यांना 'पृथ्वीराज' चित्रपटातील अक्षय आणि 'हाउसफुल ४' चित्रपटातील अक्षय यांमध्ये कोणताही फरक दिसेनासा झाला.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमाpr याचा 'पृथ्वीराज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यशराज बॅनरच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होती. हा चित्रपट सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लाँन्च सोहळ्याला अक्षयने भावुक होत हा चित्रपट प्रत्येक शाळेत दाखवण्यात यावा असं आवाहन केलं होतं. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या दिग्दर्शनाने सजलेला 'पृथ्वीराज' सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. जिथे काही नेटकरी अक्षयच्या भूमिकेचं कौतुक करत आहेत तिथे इतर नेटकरी अक्षयला ट्रोलदेखील करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर अक्षयला ट्रोल केलं जाऊ लागलं. ही ट्रोलिंग त्याच्या कोणत्याही चुकीमुळे नाहीये तर त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांमुळे आहे. नेटकऱ्यांना 'पृथ्वीराज' चित्रपटातील अक्षय आणि 'हाउसफुल ४' चित्रपटातील अक्षय यांमध्ये कोणताही फरक दिसेनासा झाला. नेटकऱ्यांच्या मते अक्षयच्या चेहऱ्यावरील भाव त्याने 'हाउसफुल ४' मध्ये साकारलेल्या बाला या पात्राप्रमाणेच आहेत. अक्षयच्या चेहऱ्यावर एखाद्या राजाच्या शौर्याचे अन धाडसाचे कोणतेही भाव नाहीत. तर तो त्याच्या आधीच्या 'बाला' या भूमिकेप्रमाणेच दिसत आहे.

एका नेटकऱ्याने अक्षयला ट्रोल करत लिहिलं, 'जेव्हा कोणतीही समर्पणाची भावना नसलेल्या फक्त पैशासाठी वर्षातून १० चित्रपट करणाऱ्या अभिनेत्याला तुम्ही चित्रपटात घेता तेव्हा हे असं होतं. बाकी सगळे सगळंच तयार करून ठेवणार आणि तुम्ही येऊन फक्त चार ओळी म्हणणार असा बनतो का चित्रपट. बायोपिकसाठी अशा अभिनेत्याला घेणं जास्त योग्य आहे जो मनापासून अभिनय करतो.' आणखी एका युझरने लिहिलं, 'पृथ्वीराज बनवायला खूप वेळ लागला म्हणून बालाच्या लूकमध्येच 'पृथ्वीराज'उरकून घेतली.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'अक्षय एक कॉमेडी अभिनेता म्हणून ठीक आहे पण या भूमिका त्याच्याकडून होत नाहीत.' अशा एकनाअनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल केलं आहे.

 

विभाग

पुढील बातम्या