मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘पृथ्वीराज’साठी अक्षय कुमारने घेतले तगडे मानधन, जाणून बसेल धक्का

‘पृथ्वीराज’साठी अक्षय कुमारने घेतले तगडे मानधन, जाणून बसेल धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi

May 11, 2022, 01:37 PM IST

    • या चित्रपटात अक्षयसोबत मानुषी छिल्लर, सोनू सूद, संजय दत्त हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या मानधनाविषयी देखील जाणून घ्या.
पृथ्वीराज (HT)

या चित्रपटात अक्षयसोबत मानुषी छिल्लर, सोनू सूद, संजय दत्त हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या मानधनाविषयी देखील जाणून घ्या.

    • या चित्रपटात अक्षयसोबत मानुषी छिल्लर, सोनू सूद, संजय दत्त हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या मानधनाविषयी देखील जाणून घ्या.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' (prithviraj) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात अक्षयसोबत मानुषी छिल्लर, सोनू सूद, संजय दत्त हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता अक्षयने या चित्रपटासाठी किती रुपये मानधन म्हणून घेतले हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Heeramandi Review: अंगावर शहारे आणणारी सीरिज! संजीदा शेख सोनाक्षी सिन्हा हिचावर भारी

'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

महेश कोठारेंची कमाल! मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार इन्स्पेक्टर महेश आणि लक्ष्याची धमाल! कशी? वाचाच...

निलेश साबळेच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’मध्ये श्रेया, कुशल आणि भारत का नाहीत? अभिनेत्याने थेट दिले उत्तर!

समोर आलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारने (Akshay Kumar) चित्रपटासाठी जवळपास ६० कोटी रुपये मानधन म्हणून घेतले आहे. मानुषीने एक कोटी रुपये घेतल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर संजय दत्तने पाच कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जात आहे. सोनू सूदने तीन कोटी रुपये घेतल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एकंदरीत चित्रपटासाठी कलाकारांनी तगडे मानधन घेतल्याचे दिसत आहे.

‘पृथ्वीराज’ हा चित्रपट महान भारतीय सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित असून अक्षय या चित्रपटात पृथ्वीराज चौहान ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री मानुषी छिल्लर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबतच चित्रपटात संजय दत्त, सोनू सूद आणि आशुतोष राणा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट ३ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.