मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips : पोळपाट-लाटणं आणू शकतं तुमच्या घरात सुख समृद्धी, काय सांगतात वास्तूचे नियम

Vastu Tips : पोळपाट-लाटणं आणू शकतं तुमच्या घरात सुख समृद्धी, काय सांगतात वास्तूचे नियम

Jan 24, 2023, 03:12 PM IST

  • Vastu Shahtra For Kitchen Tools : पोळपाट लाटण्याशी संबंधित एखादी छोटीशी चूकही कुटुंबात समस्या निर्माण करु शकतात. पोळपाट लाटणं खरेदी करताना किंवा वापरताना कोणत्या चुका टाळाव्यात हे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

पोळपाट लाटणं (हिंदुस्तान टाइम्स)

Vastu Shahtra For Kitchen Tools : पोळपाट लाटण्याशी संबंधित एखादी छोटीशी चूकही कुटुंबात समस्या निर्माण करु शकतात. पोळपाट लाटणं खरेदी करताना किंवा वापरताना कोणत्या चुका टाळाव्यात हे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

  • Vastu Shahtra For Kitchen Tools : पोळपाट लाटण्याशी संबंधित एखादी छोटीशी चूकही कुटुंबात समस्या निर्माण करु शकतात. पोळपाट लाटणं खरेदी करताना किंवा वापरताना कोणत्या चुका टाळाव्यात हे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

सामान्यतः सर्व घरांमध्ये पोळ्या बनवण्यासाठी पोळपाट लाटणं वापरलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का की वास्तूमध्ये इतर गोष्टींप्रमाणेच पोळपाट लाटणाबद्दलही काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन करून घरात सुख-समृद्धी राहते. पण पोळपाट लाटण्याशी संबंधित एखादी छोटीशी चूकही कुटुंबात समस्या निर्माण करु शकतात. पोळपाट लाटणं खरेदी करताना किंवा वापरताना कोणत्या चुका टाळाव्यात हे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. पोळपाट लाटण्याशी संबंधित वास्तु नियम जाणून घ्या.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : विषयोगात शुक्रवारचा आजचा दिवस किती महत्वाचा राहील! वाचा राशीभविष्य

May 03, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : गजकेसरी योगात आजचा दिवस कोणासाठी ठरेल खास! वाचा राशीभविष्य

May 02, 2024 04:00 AM

Guru Rashi Parivartan : या ३ राशींसाठी गुरूची चाल अशुभ, अपयश येईल, आर्थिक अडचण येईल

May 01, 2024 11:35 PM

Shukra Gochar: असुरांचा गुरु ‘शुक्र’ ग्रह करतोय अश्विनी नक्षत्रात भ्रमण! ‘या’ राशींना मिळणार भरपूर लाभ

May 01, 2024 05:58 PM

Rashi Bhavishya Today : आजचा बुधवार, मे महिन्याचा पहिला दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 01, 2024 04:00 AM

Guru Gochar: गुरु स्थान बदलणार; वृषभ राशीत प्रवेश करणार अन् धनाचा वर्षाव होणार! कुणाला होणार फायदा? जाणून घ्या...

Apr 30, 2024 05:53 PM

पोळपाट लाटणं खरेदीसाठी शुभ आणि अशुभ दिवस कोणते?

वास्तुशास्त्रामध्ये कपडे, भांडी, झाडू, सोने-चांदी आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी ज्या प्रकारे शुभ आणि अशुभ दिवस सांगण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पोळपाट लाटणं खरेदीचे दिवसही ठरलेले आहेत. वास्तूनुसार बुधवार हा पोळपाट लाटणं खरेदीसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. याशिवाय तुम्ही इतर दिवशीही ते खरेदी करू शकता. मात्र मंगळवार आणि शनिवारी पोळपाट लाटण्याची खरेदी टाळावी. या दिवशी पोळपाट लाटणं खरेदी करणे कुटुंबासाठी शुभ मानले जात नाही.

पोळपाट लाटण्याशी संबंधित या चुकांमधून नकारात्मकता येऊ शकते

चुकूनही तुटलेली लाटणं वापरू नका. त्यामुळे कुटुंबात विसंवादाचे वातावरण येऊ शकतं.

पोळपाट लाटणं वापरल्यानंतर प्रत्येक वेळी ते स्वच्छ करावे. वास्तुशास्त्रानुसार घाणेरडे पोळपाट लाटणं घराच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करतात.

वास्तुशास्त्रानुसार पोळपाट लाटणं नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावे. त्यांना उष्ट्या भांड्यांजवळ किंवा कोणत्याही अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका. तसेच, ते वरच्या बाजूला ठेवू नये.

वास्तूनुसार पोळी लाटताना पोळपाट लाटण्याचा आवाज येऊ नये हे लक्षात ठेवा. यामुळे घरात अशुभ परिस्थिती निर्माण होऊ शकते.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग