नवग्रहांमध्ये शुक्र हा सर्वात विलासी ग्रह आहे. तो सौंदर्य, विलास, प्रेम, समृद्धी, विलास इत्यादी घटकांचा दाता आहे. शुक्र असुरांचा गुरुही आहेत. जेव्हा शुक्राच्या स्थितीत विविध बदल होतात, तेव्हा त्याचा मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींवर मोठा प्रभाव पडतो. शुक्र फार कमी वेळात आपली स्थिती बदलू शकतो. तो त्याचे नक्षत्र देखील बदलतो.
या एप्रिलच्या अखेरीस शुक्राचे गोचर झाले आहे. २५ एप्रिलला शुक्राने अश्विनी नक्षत्रात संक्रमण केले आहे. याच नक्षत्रात तो येत्या ५ मेपर्यंत भ्रमण करणार आहे. शुक्राचे सलग १० दिवस भ्रमण चालणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर होत असला, तरी तीन विशिष्ट राशींना विशेष योग मिळणार आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…
मिथुन: शुक्राचे संक्रमण तुम्हाला कार्यक्षमतेत वाढ आणि प्रशंसा मिळवूनदेईल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यताही वाढते. विविध प्रकारचे प्रवास तुम्हाला चांगले परिणाम देतील.
कन्या: शुक्राचे संक्रमण तुम्हाला लाभदायी ठरणार आहे. तुमची प्रलंबित कामे तर पूर्ण होतीलच, शिवाय तुमचे सामाजिक स्थान आणि प्रतिष्ठाही वाढेल. नवीन लोकांशी संवाद वाढेल, ज्याचा परिणाम सकारात्मक होईल. तुमच्यासाठी काही सन्मान किंवा पुरस्कारही जाहीर केले जाऊ शकतात.