मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope 18 April 2024 : आज चैत्र शुक्ल दशमी, गुरुवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Horoscope 18 April 2024 : आज चैत्र शुक्ल दशमी, गुरुवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य

Apr 18, 2024, 03:20 PM IST

    • Horoscope 18 April 2024 : आज १८ एप्रिल २०२४ गुरुवार रोजी, चैत्र शुक्ल दशमीचा आजचा दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.
आजचे राशीभविष्य १८ एप्रिल २०२४

Horoscope 18 April 2024 : आज १८ एप्रिल २०२४ गुरुवार रोजी, चैत्र शुक्ल दशमीचा आजचा दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

    • Horoscope 18 April 2024 : आज १८ एप्रिल २०२४ गुरुवार रोजी, चैत्र शुक्ल दशमीचा आजचा दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे भविष्य.

आज गुरुवार १८ एप्रिल रोजी, चैत्र शुक्ल दशमी असून, आश्र्लेषा नक्षत्र आणि गंड योग आहे. आज चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत संक्रमण करणार आहे. वणिज करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : विषयोगात शुक्रवारचा आजचा दिवस किती महत्वाचा राहील! वाचा राशीभविष्य

May 03, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : गजकेसरी योगात आजचा दिवस कोणासाठी ठरेल खास! वाचा राशीभविष्य

May 02, 2024 04:00 AM

Guru Rashi Parivartan : या ३ राशींसाठी गुरूची चाल अशुभ, अपयश येईल, आर्थिक अडचण येईल

May 01, 2024 11:35 PM

Shukra Gochar: असुरांचा गुरु ‘शुक्र’ ग्रह करतोय अश्विनी नक्षत्रात भ्रमण! ‘या’ राशींना मिळणार भरपूर लाभ

May 01, 2024 05:58 PM

Rashi Bhavishya Today : आजचा बुधवार, मे महिन्याचा पहिला दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 01, 2024 04:00 AM

Guru Gochar: गुरु स्थान बदलणार; वृषभ राशीत प्रवेश करणार अन् धनाचा वर्षाव होणार! कुणाला होणार फायदा? जाणून घ्या...

Apr 30, 2024 05:53 PM

मेषः 

आज राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीची संधी आहे. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यसनापासून दूर राहा. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाल यशस्वी ठरेल. कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामेही पार पडतील. मोठ्या भावंडांची चांगली साथ मिळेल. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावध राहा. 

वृषभः 

आज आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत नुकसान होऊ शकते. खर्चाला अनेक वाटा फुटतील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. व्यवहार सतर्क राहून करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल.

मिथुन: 

आज आर्थिक गुंतवणुक करताना विचार पूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आळस दुर ठेवा. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. परदेश भ्रमणाची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या संधी मिळतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. कामात यश मिळण्याचे योग आहेत. केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. 

कर्क: 

आज आळशीपणा कराल. परदेशा संदर्भात काही कामे असतील तर ती रखडतील. घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. प्रगतीचा मार्ग समजावून घेताना कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. 

सिंह: 

आज महत्वाची कागदोपत्रे सांभाळा, हरवू शकतात. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशगमनात अडचणी आल्यामुळे परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. 

कन्या: 

आज नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मनात असंतोष निर्माण होईल. मोठे व्यवहार टाळावेत. वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. मनःस्तापाचे प्रसंग येतील. गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. कोणताही विषय जास्त ताणू नये. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. 

तूळ: 

आज घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक ग्रहमान आहेत. पदोन्नती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

वृश्चिक: 

आज मंगळ चंद्र योग पाहता करियरमध्ये तुमच्या चपळ कार्य क्षमतेमुळे आपापल्या कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा तुम्ही उतरवणार आहात. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. तुमचे एखाद्या विषयामध्ये जेवढे ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. 

धनु: 

आज मनःशांती मिळेल. फक्त यामध्ये थोडे धाडस दाखवा. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. इच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. 

मकरः 

आज विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील. अशावेळी मानसिक अस्थिरता जाणवेल. संतीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. त्यांच्या करिअर संबंधी चिंतेत पडाल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील.

कुंभ: 

आज आरोग्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. सहकार्य चांगले मिळणार आहे. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. तुम्ही इतके आशावादी आहात की तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होईल. 

मीनः 

आज काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटूंबातील सदस्याचे आपल्या विषयी चांगले मत असेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील.