मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips For Home : शेजारच्यांच्या या गोष्टी तुम्ही आपल्या घरात वापरता का?

Vastu Tips For Home : शेजारच्यांच्या या गोष्टी तुम्ही आपल्या घरात वापरता का?

May 11, 2023, 01:51 PM IST

  • Vastu Shastra : काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला विकतच घेऊनच वापरल्या पाहिजेत असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्राच्या मते काही गोष्टी इतरांकडून फुकट न घेता त्या आपण विकत घेऊनच वापरल्या पाहिजेत

या गोष्टी विकत घेऊनच वापरा (Freepik)

Vastu Shastra : काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला विकतच घेऊनच वापरल्या पाहिजेत असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्राच्या मते काही गोष्टी इतरांकडून फुकट न घेता त्या आपण विकत घेऊनच वापरल्या पाहिजेत

  • Vastu Shastra : काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला विकतच घेऊनच वापरल्या पाहिजेत असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्राच्या मते काही गोष्टी इतरांकडून फुकट न घेता त्या आपण विकत घेऊनच वापरल्या पाहिजेत

आपलं घर हे आपल्यासाठी सर्वस्व असतं. आपल्या सुखदु:खाचा साथीदार आपलं घर असतं. आपल्याला आपलं घर निवारा देत. कधी हे घर आपल्यासाठी संरक्षक म्हणून भूमिका बजावतं तर कधी हे घर आपल्या सुखद आठवणींनी भरून गेलेलं असतं. मात्र घरात एखादी गोष्ट संपली असेल तर शेजारी जाऊन सर्रास ती गोष्ट मागण्याची आपल्याकडे पद्धत आहे.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : विषयोगात शुक्रवारचा आजचा दिवस किती महत्वाचा राहील! वाचा राशीभविष्य

May 03, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : गजकेसरी योगात आजचा दिवस कोणासाठी ठरेल खास! वाचा राशीभविष्य

May 02, 2024 04:00 AM

Guru Rashi Parivartan : या ३ राशींसाठी गुरूची चाल अशुभ, अपयश येईल, आर्थिक अडचण येईल

May 01, 2024 11:35 PM

Shukra Gochar: असुरांचा गुरु ‘शुक्र’ ग्रह करतोय अश्विनी नक्षत्रात भ्रमण! ‘या’ राशींना मिळणार भरपूर लाभ

May 01, 2024 05:58 PM

Rashi Bhavishya Today : आजचा बुधवार, मे महिन्याचा पहिला दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 01, 2024 04:00 AM

Guru Gochar: गुरु स्थान बदलणार; वृषभ राशीत प्रवेश करणार अन् धनाचा वर्षाव होणार! कुणाला होणार फायदा? जाणून घ्या...

Apr 30, 2024 05:53 PM

मात्र काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला विकतच घेऊनच वापरल्या पाहिजेत असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्राच्या मते काही गोष्टी इतरांकडून फुकट न घेता त्या आपण विकत घेऊनच वापरल्या पाहिजेत. कोणत्या आहेत त्या गोष्टी आपण पाहूया.  

कोणत्या गोष्टी शेजारहून आणू नयेत किंवा फुकट वापरू नयेत

शेजाऱ्यांकडून दही आणू नका

अनेकदा घरात आपल्याला दही लावायचं असतं. मग अशात आपण शेजाऱ्यांकडून थोडं दही घेऊन येतो. मात्र असं करत असाल तर जरा थांबा कारण असे मानले जाते की शेजाऱ्यांकडून दही आणल्याने घरातील शांतता नष्ट होते. म्हणूनच दही खरेदी केल्यानंतरच वापरावे.

शेजाऱ्यांकडून मोहरीचं तेल आणू नका

मोहरीचे तेल कधीही फुकटातलं किंवा मागुन आणलेलं वापरू नये. असं केल्यास  शनिदेव क्रोधित होतात आणि त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागतात.

शेजाऱ्यांकडून लोखंडी वस्तू आणू नये

लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहे. त्यामुळे लोखंडापासून बनवलेल्या वस्तू इतरांकडून आणून वापरू नयेत. असे केल्याने आर्थिक संकट वाढते, तसेच घरातील शांतताही भंग पावते.

शेजाऱ्यांकडून मीठ मागू नका

मीठ हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. बर्‍याच लोकांना अशी सवय असते की स्वयंपाक करताना मीठ संपले तर ते शेजाऱ्यांकडे मिठाची मागणी करतात. मात्र मीठ हे नेहमी खरेदी केल्यानंतर वापरावे असं सांगितलं जातं. फुकटचं मीठ वापरल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात. हे ऋण मृत्यूनंतरही फेडावं लागतं, असं मानलं जातं.

शेजाऱ्यांकडून सुई मागू नका

घरोघरी शिवण्यासाठी सुई आपल्याला सर्रास पाहायला मिळते कधी सुई तुटते. मग कधीतरी धावपळ असल्यास शेजाऱ्यांकडून सुई आणून ती वापरली जाते. ज्योतिषशास्त्रनुसार त्या सुईबरोबर तुम्ही त्या व्यक्तीच्या वाट्याचा शनिचा प्रभावही तुम्ही तुमच्या घरात आणत आहात. म्हणूनच सुई नेहमी खरेदी करा आणि वापरा.

इतरांचा रुमाल वापरू नका

मित्राचा किंवा मैत्रिणीचा रुमाल वापरणंही अशुभ मानलं गेलं आहे. असं केल्यास मैत्रीत दुरावा येतो. याशिवाय काळे तीळ,माचिस,दूध याही गोष्टी कायम विकत घेऊनच वापराव्या असं सांगण्यात येतं.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग