मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Team India-Death Overs: १९व्या ओव्हरचं करायचं काय? ठरतेय टीम इंडियाची सर्वात मोठी कमजोरी

Team India-Death Overs: १९व्या ओव्हरचं करायचं काय? ठरतेय टीम इंडियाची सर्वात मोठी कमजोरी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 03, 2022 11:34 AM IST

Team India death overs bowling problem: टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या रंगात दिसत आहेत. त्याचवेळी, सूर्यकुमार यादव सध्या त्याच्या कारकिर्दीच्या सुवर्ण टप्प्यात आहे. दिनेश कार्तिकही फिनिशर म्हणून चमकला आहे. पण भारतीय गोलंदाज डेथ ओव्हर्समध्ये चांगलाच मार खात आहेत.

INDIAN BOWLERS
INDIAN BOWLERS

टीम इंडियाने दक्षिण आफ्रेविरुद्धचा दुसरा सामना १६ धावांनी जिंकला. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २३७ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात आफ्रिकेच्या फलंदाजांनीही भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मात्र, ते विजयी होऊ शकले नाहीत.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, या सामन्यानंतर भारतीय गोलंदाजीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. कारण सध्या २३७ धावा करुनही भारत विजयी होईल याची खात्री देत येत नाही. विशेष म्हणजे १९ वे षटक हे भारतासाठी भयानक स्वप्न ठरत चालले आहे. आशिया चषकापासून सुरू झालेली ही मालिका आजतागायत सुरू आहे.

गुवाहाटीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 मध्ये अर्शदीप सिंग ने १९ वे षटक टाकले. या षटकात अर्शदीपने २ षटकार आणि २ चौकारांसह एकूण २६ धावा दिल्या. यादरम्यान त्याने एक नो बॉलही टाकला. आफ्रिकेने शेटच्या २ षटकांत ४६ धावा चोपल्या. ही चिंतेची बाब आहे.

जसप्रीत बुमराह

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात ४ वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. दीपक चहर आणि मोहम्मद शमी यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

भारताच्या शेवटच्या १० T20 सामन्यांमध्ये बुमराहने फक्त दोनच सामने खेळले आहेत. त्याने ६ षटकात ७३ धावा देत फक्त एक विकेट घेतली आहे.

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार सुरुवातीच्या षटकांत चांगली गोलंदाजी करतो. त्याने गेल्या ७ टी-२० सामन्यात १२ विकेट घेतल्या आहेत. मात्र, डेथ ओव्हर्समध्ये तो धावा रोखण्यात अपयशी ठरला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने १९ वे षटक टाकले होते. ते दोन्ही सामने भारताने गमावले.

हर्षल पटेल

हर्षल पटेलने गेल्या ५ सामन्यातील १६ षटकात १७० धावा दिल्या आहेत. तो केवळ ३ विकेट घेण्यात यशस्वी ठरला. म्हणजेच त्याने प्रत्येक षटकात जवळापस ११ धावा दिल्या आहेत.

अर्शदीप सिंग

अर्शदीप सिंगने अलीकडच्या काळात डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजी केली आहे. आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत तो पहिल्याच षटकात विकेट घेण्यात यशस्वी ठरला. मात्र, दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्शदीपने ४ षटकांत ६२ धावा दिल्या. तर १९ व्या षटकात त्याने २६ धावा दिल्या.

WhatsApp channel

संबंधित बातम्या