मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: रोहित शर्मा पोलार्ड-ब्राव्होच्या स्पेशल क्लबमध्ये, ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव भारतीय

Rohit Sharma: रोहित शर्मा पोलार्ड-ब्राव्होच्या स्पेशल क्लबमध्ये, ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव भारतीय

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 02, 2022 08:03 PM IST

Rohit Sharma 400th T20 match: जगात सर्वाधिक T20 सामने खेळण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरोन पोलार्डच्या नावावर आहे. पोलार्डने आतापर्यंत ६१४ सामने खेळले आहेत.

Rohit Sharma
Rohit Sharma

भारतीय कर्णधार रोहित शर्माने रविवारी क्रिकेटच्या मैदानावर आणखी एक नवा विक्रम नोंदवला आहे. रोहित शर्मा ४०० T20 सामने खेळणारा पहिला भारतीय आणि जगातील नववा क्रिकेटपटू ठरला आहे. रविवारी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात रोहितने ही कामगिरी केली.

ट्रेंडिंग न्यूज

या आधीच रोहित शर्माच्या नावावर भारतासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम आहे. भारतीय कर्णधाराने आतापर्यंत १४० T20I सामने खेळले आहेत.

तर रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि एमएस धोनी या भारतीय क्रिकेटपटूंनी ३५० पेक्षा जास्त टी-२० सामने खेळले आहेत. रोहित २००७ च्या विश्वचषकापासून टी-20 सामने खेळत आहे.

सर्वाधिक T20 सामने खेळलेले भारतीय

४००- रोहित शर्मा

३६८ - दिनेश कार्तिक

३६१ - एमएस धोनी

३५४ - विराट कोहली

३३६ - सुरेश रैना

जगात सर्वाधिक T20 सामने खेळणारे खेळाडू

जगात सर्वाधिक T20 सामने खेळण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरोन पोलार्डच्या नावावर आहे. पोलार्डने आतापर्यंत ६१४ सामने खेळले आहेत. त्याच्यापाठोपाठ ड्वेन ब्राव्हो (५५६), शोएब मलिक (४८१), ख्रिस गेल (४६३), सुनील नरेन (४३५), रवी बोप्रा (४२९), आंद्रे रसेल (४२८) आणि डेव्हिड मिलर (४०२) यांचा क्रमांक लागतो.

WhatsApp channel

संबंधित बातम्या