मराठी बातम्या  /  क्रीडा  /  भुवनेश्वर कुमारने रचला इतिहास,पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल

भुवनेश्वर कुमारने रचला इतिहास,पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jul 10, 2022 10:13 AM IST

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वर कुमारने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत पहिल्याच षटकात १४ बळी घेतले आहेत

भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमार (हिंदुस्तान टाइम्स)

ज्या पद्धतीनं टीम इंडियाचा (Team India Bowler) वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) पहिल्या काही षटकांमध्ये चेंडू स्विंग करतो, त्याला तोड नाही. जोस बटलरसारखे गोलंदाज क्लीन बोल्ड होतात आणि जेसन रॉयसारख्या फलंदाजांना चेंडू कोणत्या दिशेने जाईल हे समजत नाही. यामुळेच भुवनेश्वर कुमारने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वास्तविक, भुवनेश्वर कुमार आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वर कुमारने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत पहिल्याच षटकात १४ बळी घेतले आहेत. या फॉरमॅटमध्ये कोणत्याही गोलंदाजाने त्याच्यापेक्षा जास्त विकेट घेतलेल्या नाहीत. बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडच्या सलामीवीराला बाद करताच भुवनेश्वर कुमार पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.

उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पहिल्या षटकात १४ बळी घेतले आहेत, तर डेव्हिड विलीने १३, अँजेलो मॅथ्यूजने ११, टीम साऊदीने ९ आणि डेल स्टेनने ९ विकेट्स घेतल्या आहेत. ही आकडेवारी कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांचा भाग असलेल्या खेळाडूंची आहे. याशिवाय भारताकडून भुवनेश्वर कुमारनंतर आर अश्विनने (४ विकेट) पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेतले आहेत.

भुवनेश्वर कुमार पहिल्याच षटकात का यशस्वी होतो?

वास्तविक, भुवनेश्वर कुमार पहिल्या षटकात इतका यशस्वी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्विंग गोलंदाजी. भुवनेश्वरला पहिल्याच षटकात नव्या चेंडूतून ज्या प्रकारचा स्विंग मिळतो तो कोणत्याही गोलंदाजाला सोपा नाही. जर एखाद्या फलंदाजाने बॅट चालवली तर चेंडू विकेटच्या मागच्या बाजूला जातो, बॅट न चालवताना किंवा चेंडू चुकला तर स्टंप उखडून टाकतो, कारण त्याचा चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग होतो. गेल्या काही वर्षात भुवनेश्वर कुमारने आपल्या स्विंग गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवल्याचं पाहायला मिळालंय. भुवनेश्वर कुमार आज टीम इंडियाच्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात एक प्रमुख अस्त्र म्हणून पाहिला जात आहे.आगामी वर्ल्ड कप टी२० मध्ये भुवनेश्वर भारतीय संघात प्रमुख भूमिका बजावताना पाहायला मिळणार आहे.

 

 

WhatsApp channel