मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Yashasvi Jaiswal IPL 2023 : आयपीएलमध्ये जैस्वालचा ‘यशस्वी’ पराक्रम, हैदराबादची धुलाई करत रचला मोठा विक्रम

Yashasvi Jaiswal IPL 2023 : आयपीएलमध्ये जैस्वालचा ‘यशस्वी’ पराक्रम, हैदराबादची धुलाई करत रचला मोठा विक्रम

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 08, 2023 05:58 PM IST

Yashasvi Jaiswal In IPL 2023 : राजस्थानचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आयपीएलमध्ये मोठा पराक्रम केला आहे.

Yashasvi Jaiswal Records In IPL 2023
Yashasvi Jaiswal Records In IPL 2023 (PTI)

Yashasvi Jaiswal Records In IPL 2023 : यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने धडाकेबाज फलंदाजी करत अनेकांचं लक्ष वेधलं आहे. काल जयपुरमध्ये सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात यशस्वी जैस्वालने ३५ धावांची वादळी खेळी करत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. यशस्वी जैस्वाल आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात एक हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉ यांनी ही कामगिरी केली होती. त्यामुळं आता प्लेऑफच्या वाटेवर असलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी हे चांगले संकेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर आणि युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला आयपीएलमध्ये एक हजार धावा करण्यासाठी फक्त ११ धावांची गरज होती. यशस्वीने १८ चेंडूत पाच चौकार आणि दोन उत्तुंग षटकार लगावत ३५ धावांची वादळी खेळी केली. त्यामुळं त्याने केवळ ३४ सामन्यांतच एक हजार धावांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडूलकर, सुरेश रैना, ऋभष पंत आणि पृथ्वी शॉ यांनी ही कामगिरी केली होती. त्यामुळं आता आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळं यशस्वी जैस्वालचं चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे.

संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने ११ सामन्यांपैकी पाच सामने जिंकत आयपीएलच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. गुजरात पहिल्या, चेन्नई दुसऱ्या आणि लखनौ तिसऱ्या स्थानी आहे. विराट कोहलीचा आरसीबी संघ पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळं आता प्लेऑफमध्ये धडक देण्यासाठी आयपीएलमधील प्रत्येक संघ उत्तम कामगिरी करत असल्याचं दिसून येत आहे.

WhatsApp channel