मराठी बातम्या  /  क्रीडा  /  LSG In IPL 2023 : लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का, स्टार गोलंदाज आयपीएल सोडून मायदेशी परतला

LSG In IPL 2023 : लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का, स्टार गोलंदाज आयपीएल सोडून मायदेशी परतला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 08, 2023 05:32 PM IST

Lucknow Super Giants : कर्णधार केएल राहुलला दुखापत झाल्यानंतर आता लखनौचा आणखी एक खेळाडू आयपीएलमधून बाहेर झाला आहे.

Lucknow Super Giants
Lucknow Super Giants (PTI)

Mark Wood Lucknow Super Giants : आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुल याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळं तो आयपीएलमधील काही सामने खेळू शकणार नाहीये. त्यानंतर लखनौचा गोलंदाज जयदेव उनादकट याला दुखापत झाल्यामुळं तो आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्यातच आता लखनौ सुपरजायंट्सच्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनौचा मुख्य वेगवान गोलंदाज मार्क वुड याने आयपीएल सोडून मायदेशी म्हणजेच इंग्लंडला परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता आयपीएलमध्ये प्लेऑफच्या शर्यती सुरू असतानाच लखनौला तिसरा मोठा धक्का बसला आहे.

वेगवान गोलंदाज मार्क वुडने आयपीएल सोडून इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतल्याने लखनौने एक व्हिडिओ शेयर करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यात मार्क वुडने मायदेशी परतण्याचं कारण सांगितलं आहे. मार्क वुडची पत्नी साहा गर्भवती असून ती लवकरच बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळं तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मार्क वुड आयपीएल सोडून इंग्लंडला परतला आहे. आयपीएलमध्ये लखनौला सोडून जात असल्यामुळं दु:ख होत असल्याचं वुडने म्हटलं आहे. तसेच मी इंग्लंडमधून लवकर परत येणार असल्याचं आश्वासन मार्क वुडने लखनौच्या चाहत्यांना दिलं आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये मार्क वुड फक्त पाच सामने खेळला असून त्यात त्याने ११ विकेट्स घेतल्या आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एका सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा विक्रमही मार्क वुडने केला आहे. त्यामुळं आता प्लेऑफची शर्यत सुरू झालेली असतानाच मार्क वुड आयपीएल सोडून मायदेशी परतल्यामुळं लखनौ सुपरजायंट्सला मोठा धक्का बसला आहे. केएल राहुल, जयदेव उनादकट आणि मार्क वुड हे खेळाडू बाहेर झाल्यामुळं प्रशिक्षक गौतम गंभीरच्या अडचणी वाढल्या आहे.

WhatsApp channel