मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kokan Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी विजेत्याने कुस्ती सुरू असतानाच आखाडा सोडला, कोकण केसरी स्पर्धेतील धक्कादायक प्रकार

Kokan Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी विजेत्याने कुस्ती सुरू असतानाच आखाडा सोडला, कोकण केसरी स्पर्धेतील धक्कादायक प्रकार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 08, 2023 04:41 PM IST

Kokan Kesari 2023 : पंचांचा निर्णय न आवडल्यामुळे महाराष्ट्र केसरी विजेत्याने कुस्तीच्या आखाड्यातून माघार घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Bala Rafiq Shaikh In Kokan Kesari 2023
Bala Rafiq Shaikh In Kokan Kesari 2023 (HT)

Bala Rafiq Shaikh In Kokan Kesari 2023 : यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दिग्गज कुस्तीपटू सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता कोकण केसरी स्पर्धेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंचांचा निर्णय न आवडल्यामुळं माजी महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफीक शेखने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. चिपळुणमध्ये होत असलेल्या कोकण केसरी कुस्ती स्पर्धेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळं आता महाराष्ट्र केसरी जिंकलेल्या पैलवानाने कुस्तीच्या आखाड्यातून माघार घेतल्यामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे कोकण केसरी स्पर्धा सुरू होती. त्यावेळी माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख आणि महाराष्ट्र उपकेसरी प्रकाश बनकर यांच्या कुस्ती सुरू होती. त्यावेळी पंचांनी दिलेला निर्णय न आवडल्यामुळे बाला शेखने कुस्तीचा आखाडा सोडत स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुस्तीचे प्रशिक्षक आणि वरिष्ठ पंचांनी विनंती केल्यानंतर बालाने माघारीचा निर्णय मागे घेतला. परंतु त्यानंतरही कुस्तीचा निर्णय न लागल्यामुळं सामना बरोबरीत सुटला. चिपळुणमधील या धक्कादायक घटनेमुळं महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

CSK In IPL 2023 : महेंद्रसिंह धोनीच्या संथ फलंदाजीमुळे भारताचा माजी खेळाडू भडकला, म्हणाला...

बाला रफीक शेख याने २०१८ साली अभिजित कटकेचा पराभव करत महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर बालाने महाराष्ट्रासह देशातील अनेक नामवंत स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. बाला रफीक शेख हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या खडकी या गावातला आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून बाला शेख याच्या घरात कुस्ती खेळण्याची परंपरा आहे. त्यामुळं आता त्याने कोकण कुस्ती स्पर्धेतून माघार घेतल्यामुळं त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

WhatsApp channel