मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli : गंभीरच्या लखनौची धुलाई करणाऱ्या फलंदाजाचं कोहलीकडून कौतुक, म्हणाला...

Virat Kohli : गंभीरच्या लखनौची धुलाई करणाऱ्या फलंदाजाचं कोहलीकडून कौतुक, म्हणाला...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 08, 2023 03:48 PM IST

Virat Kohli IPL 2023 : लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध विस्फोटक खेळी करणाऱ्या फलंदाजाचं विराट कोहलीने तोंडभरून कौतुक केलं आहे.

Royal Challengers Bangalore's Virat Kohli
Royal Challengers Bangalore's Virat Kohli (AP)

Virat Kohli On Wriddhiman Saha : यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफची शर्यत सुरू झाल्यानंतर अनेक संघांमध्ये चांगलीच चुरस वाढल्याचं दिसून येत आहे. गुजरात, चेन्नई, लखनौ, राजस्थान आणि आरसीबी या संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आणखी विजय मिळवावे लागणार आहे. परंतु आता काल झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने लखनौ सुपरजायंट्सचा तब्बल ५७ धावांनी पराभव केला. त्यात गुजरातचा सलामीवीर वृद्धिमान साहाने वादळी खेळी करत लखनौसमोर दोनशेपेक्षा अधिक धावांचा डोंगर उभा केला.

लखनौच्या गोलंदाजांना चोपून काढणाऱ्या वृद्धिमान साहाचं आरसीबीचा सलामीवीर विराट कोहलीने चांगलंच कौतुक केलं आहे. लखनौविरुद्ध झालेल्या सामन्यात साहाने ४३ चेंडूत ८१ धावांची खेळी केली होती. गुजरातच्या साहाने गौतम गंभीरच्या लखनौची धुलाई केल्यामुळं विराट कोहलीने साहाचं तोंडभरून कौतुक केल्यामुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. विराट कोहलीने गुजरात आणि लखनौतील सामना पाहिल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेयर केली आहे. त्यात त्याने टीव्ही स्क्रिनचा फोटो शेयर करताना 'काय खेळाडू आहे, वृद्धि', असं म्हणत वृद्धिमान साहाचं कौतुक केलं आहे.

लखनौ सुपरजायंट्स आणि आरसीबीत झालेल्या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. याशिवाय नवीन उल-हक, अमित मिश्रा यांचाही विराट कोहलीशी वाद झाला होता. त्यामुळं आता गौतम गंभीरला कायम पाण्यात पाहणाऱ्या विराट कोहलीने गंभीरला डिवचण्यासाठी तर साहाचं कौतुक केलं नाही ना?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

WhatsApp channel