मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CSK In IPL 2023 : महेंद्रसिंह धोनीच्या संथ फलंदाजीमुळे भारताचा माजी खेळाडू भडकला, म्हणाला...

CSK In IPL 2023 : महेंद्रसिंह धोनीच्या संथ फलंदाजीमुळे भारताचा माजी खेळाडू भडकला, म्हणाला...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 08, 2023 04:18 PM IST

Mahendra Singh Dhoni : राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला अखेरच्या षटकात सामना जिंकवता आला नव्हता.

Krishnamachari Srikkanth On Mahendra Singh Dhoni
Krishnamachari Srikkanth On Mahendra Singh Dhoni (AP)

Krishnamachari Srikkanth On Mahendra Singh Dhoni : यंदाच्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने सहा सामने जिंकत प्लेऑफच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीला उत्तम फिनिशर समजलं जातं. परंतु आता यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी संथ फलंदाजी करत असल्यामुळं भारताच्या माजी खेळाडूने धोनीवर जोरदार टीका केली आहे. महेंद्रसिंह धोनी हा ओवररेटेड फिनिशर असून आयपीएलमध्ये अनसोल्ड ठरलेल्या गोलंदाजाला त्याला खेळात आलं नाही, असं म्हणत टीम इंडियाचे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीवर जोरदार निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात सीएसकेला विजयासाठी १४ धावांची गरज होती. त्यावेळी अखेरच्या चेंडूवर चार धावा आवश्यक होत्या. परंतु संदीप सिंहच्या यॉर्करवर धोनीला मोठा फटका मारता आला नव्हता. त्यामुळं टीम इंडियाचे माजी खेळाडू कृष्णम्माचारी श्रीकांत हे महेंद्रसिंह धोनीवर चांगलेच भडकले. आयपीएलमध्ये धोनी ओवररेटेड फिनिशर असून अनसोल्ड राहिलेल्या गोलंदाजाविरुद्ध तो सीएसकेला सामना जिंकून देऊ शकला नाही, असं म्हणत श्रीकांत यांनी धोनीवर टीका केली आहे.

Virat Kohli : गंभीरच्या लखनौची धुलाई करणाऱ्या फलंदाजाचं कोहलीकडून कौतुक, म्हणाला...

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात एसआरएचने अखेरच्या षटकात थरारक सामना जिंकला होता. त्यावेळी हैदराबादच्या अब्दुल समदने अखेरच्या षटकात संदीप सिंहची चांगलीच धुलाई केली होती. त्यामुळं समद सारखा फलंदाज संदीपला धुलाई करू शकतो तर धोनी का नाही?, असा देखील प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.

WhatsApp channel