मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CSK vs RR : तिसऱ्या विजयासाठी धोनीचा कसून सराव, संजू सॅमसननेही मैदानावर गाळला घाम

CSK vs RR : तिसऱ्या विजयासाठी धोनीचा कसून सराव, संजू सॅमसननेही मैदानावर गाळला घाम

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 11, 2023 10:05 PM IST

CSK vs RR IPL 2023 : आयपीएलमधील तिसऱ्या विजयासाठी सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मैदानावर कसून सराव केला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Chennai: Chennai Super Kings captain MS Dhoni before the start of the IPL 2023 cricket match between Chennai Super Kings and Lucknow Super Giants, at M. A. Chidambaram Stadium, in Chennai, Monday, April 3, 2023. (PTI Photo/R Senthil Kumar)(PTI04_03_2023_000223A)
Chennai: Chennai Super Kings captain MS Dhoni before the start of the IPL 2023 cricket match between Chennai Super Kings and Lucknow Super Giants, at M. A. Chidambaram Stadium, in Chennai, Monday, April 3, 2023. (PTI Photo/R Senthil Kumar)(PTI04_03_2023_000223A) (PTI)

MS Dhoni Practice Video : आयपीएलमध्ये अनेक संघ विजयासाठी मोठी कसरत करत असल्यामुळं आता स्पर्धेची चुरस चांगलीच वाढली आहे. बुधवारी महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये सामना रंगणार आहे. सीएसकेविरुद्धच्या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्सचा संघ चेन्नईला पोहोचला आहे. यंदाच्या आयपीएलच्या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. त्यामुळं दोन्ही संघांनी तिसऱ्या विजयासाठी कंबर कसली आहे. त्यातच आता राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी एकत्र सराव केला आहे. त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एमएस धोनी आणि संजू सॅमसन यांच्या सरावाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी आणि सॅमसन एकाच फ्रेममध्ये एकसोबत शॉट मारताना दिसत आहे. त्यामुळं आता चेन्नईतील उद्याचा सामना चांगलाच रंगतदार होण्याची शक्यता आहे. महेंद्रसिंह धोनीच्या सीएसके संघाने आयपीएलच्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत, तर राजस्थाननेही दोन सामने जिंकत आयपीएलमध्ये वर्चस्व निर्माण केलं आहे. त्यामुळं आता दोन्ही संघ आयपीएलमधील तिसऱ्या विजयासाठी एकमेकांविरोधात भिडणार आहेत.

पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान दुसऱ्या स्थानी...

यंदाच्या आयपीएलची सुरुवात राजस्थान आणि चेन्नईसाठी चांगली झालेली आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी केवळ एक सामना गमावलेला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत लखनौ सुपर जायंट्स पहिल्या तर राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआर तिसऱ्या, गुजरात टायटन्स चौथ्या आणि चेन्नई सुपरकिंग्ज पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळं आता उद्याचा सामना जिंकून क्रमवारीत सुधारणा करण्याचा प्रयत्न सीएसके आणि राजस्थान या संघांचा असणार आहे.

WhatsApp channel