मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs PAK : गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंना ट्रोल करणं पाकिस्तानी चाहत्याला महागात पडलं; पाहा काय घडलं?

IND vs PAK : गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंना ट्रोल करणं पाकिस्तानी चाहत्याला महागात पडलं; पाहा काय घडलं?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 24, 2022 01:53 PM IST

IND vs PAK T20 Match : विराट कोहलीच्या तडाखेबंद खेळीनंतर भारतानं पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यानंतर गुगलचे सीईओंनी केलेल्या ट्विटला पाकिस्तानी चाहत्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

IND vs PAK Match In T20 World Cup 2022
IND vs PAK Match In T20 World Cup 2022 (HT)

IND vs PAK Match In T20 World Cup 2022 : टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच रोमांचक सामन्यात भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे. विराट कोहलीच्या तडाखेबंद खेळीनंतर भारतानं एक दिवस आधीच दिवाळी साजरी केली आहे. त्यामुळं आता जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून भारतीय संघाचं कौतुक करण्यात येत असताना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही भारत-पाक सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भन्नाट रिप्लाय देत ट्रोलर्सचा डाव हाणून पाडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकं काय झालं?

भारतानं पाकिस्तानला हरवल्यानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करत भारतीय संघाचं कौतुक करताना म्हटलं की, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, तुम्ही सर्वजण आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करत असाल. मी आज परत एकदा भारत-पाक सामन्यातील शेवटची तीन ओव्हर पाहून दिवाळी साजरी केली आहे. भारतीय संघानं चांगली कामगिरी केली आहे, अप्रतिम. असं ट्विट सुंदर पिचाई यांनी केलं होतं. त्यानंतर पाकिस्तानच्या एका चाहत्यानं त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

पिचाई यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना पाकच्या एका चाहत्यानं म्हटलं की, तुम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये सुरुवातीच्या तीन ओव्हर पाहायला हव्या होत्या, असं म्हणत पाकिस्तानच्या चाहत्यानं पिचाईंची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पाकिस्तानी चाहत्याचा ट्रोल करण्याचा डाव हाणून पाडला.

पाकिस्तानी चाहत्याला उत्तर देताना गुगलचे सीईओ म्हणाले की, हो मी त्या तीन ओव्हरही बघितल्या, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीपसिंगनं काय स्पेल टाकला?, असं म्हणत पाकिस्तानी चाहत्याच्या कमेंटवर भन्नाट रिप्लाय दिला. त्यानंतर भारतीय चाहत्यांनीही पाकिस्तानी ट्रोलर्सची खेचायला सुरुवात केली.

दरम्यान पाकिस्तानच्या पहिल्या डावात अर्शदीपनं पहिल्याच चेंडूवर कर्णधार बाबर आझमला बाद केलं होतं. याशिवाय पहिल्या तीन ओव्हरमध्येच पाकचे तीन फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी बाद केलं होतं. त्यानंतर भारताच्या डावाचीही सुरुवात काहीशी अशीच झाली होती. कारण केएल राहुल, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे स्वस्तात बाद झाले होते. त्यावरून ट्विटरवर हा सगळा राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

WhatsApp channel