मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni Video : सुजलेले गुडघे आणि प्रचंड वेदना सहन करत धोनीनं संपूर्ण IPL खेळलं, चाहत्यांना रडवणारा व्हिडीओ

MS Dhoni Video : सुजलेले गुडघे आणि प्रचंड वेदना सहन करत धोनीनं संपूर्ण IPL खेळलं, चाहत्यांना रडवणारा व्हिडीओ

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 01, 2023 12:46 PM IST

ms dhoni strapping his knee video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी गुडघ्यावर पट्टी बांधताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इतक्या वेदना सहन करून धोनीने आयपीएलचे सर्व सामने खेळले, याचे कौतुक चाहते करत आहे.

ms dhoni strapping his knee
ms dhoni strapping his knee

ms dhoni knee injury update : आयपीएल 2023 चा हंगाम संपला आहे. जवळपास दोन महिने चाललेल्या या क्रिकेटच्या महाकुंभात ७४ सामने खेळले गेले. महेंद्रसिंह धोनीच्या (ms dhoni) तृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने (CSK) २९ मे (सोमवार) रोजी गुजरात टायटन्सचा (GT) ५ विकेट्सने पराभव करून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

त्याचवेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दिसत आहे. महेंद्रसिंग धोनीने दुखापतीने त्रस्त असलेल्या गुडघ्यावर पट्टी बांधल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. धोनी इतक्या वेदनेत असतानाही त्याने आयपीएलचे सर्व सामने खेळले.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

महेंद्रसिंग धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून महेंद्रसिंग धोनीच्या समर्पणाचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी जखमी गुडघ्यावर पट्टी बांधताना दिसत आहे.

त्याचवेळी महेंद्रसिंग धोनी लवकरच मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात जाणार असल्याचे समजते आहे. कोकिलाबेन रुग्णालयात धोनीच्या गुडघ्यांवर अनेक चाचण्या करण्यात येणार आहेत. कॅप्टन कूल या आठवड्यात मुंबईला जाऊ शकतो.

सर्वात यशस्वी कर्णधार

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीची गणना आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. याशिवाय महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ साली एकदिवसीय विश्वचषक आणि २००७ साली T20 विश्वचषक जिंकला आहे. तसेच, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

WhatsApp channel