मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Team India Schedule : IPL नंतर काय? WTC फायनल ते वनडे वर्ल्डकप, असं आहे टीम इंडियाचं पुढचं वेळापत्रक

Team India Schedule : IPL नंतर काय? WTC फायनल ते वनडे वर्ल्डकप, असं आहे टीम इंडियाचं पुढचं वेळापत्रक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 01, 2023 10:43 AM IST

team india cricket schedule : टीम इंडियासाठी एक चांगली बातमी अशीही आली आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय संघाला जवळपास महिनाभर विश्रांती मिळू शकते.

team india cricket schedule
team india cricket schedule

team india schedule after ipl 2023 : आयपीएल 2023 चा हंगाम संपला आहे. जवळपास दोन महिने चाललेल्या या क्रिकेटच्या महाकुंभात ७४ सामने खेळले गेले. महेंद्रसिंह धोनीच्या (ms dhoni) तृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने (CSK) २९ मे (सोमवार) रोजी गुजरात टायटन्सचा (GT) ५ विकेट्सने पराभव करून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

ट्रेंडिंग न्यूज

आता आयपीएलचा थरार संपल्यानंतर भारतीय खेळाडूंची नॅशनल ड्यूटी सुरू झाली आहे.

जवळपास २ महिने चाललेल्या या आयपीएल मोसमात सतत खेळून भारतीय खेळाडू खूप थकलेले दिसत आहेत. भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळालेली नाही. टीम इंडियाला एका आठवड्यानंतरच वर्ल्ड टेस्ट टॅम्पियशीपचा (wtc final ind vs aus) अंतिम सामना खेळायचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC FINAL ७ ते ११ जून दरम्यान लंडनमध्ये होणार आहे.

टीम इंडियाला १ महिन्याचा ब्रेक?

या दरम्यान, टीम इंडियासाठी एक चांगली बातमी अशीही आली आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय संघाला जवळपास महिनाभर विश्रांती मिळू शकते. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघाला २० ते ३० जून दरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे, मात्र, ही मालिका आता रद्द केली जाऊ शकते.

यानंतर, भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. वेस्ट इंडिजमध्ये १२ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत २ कसोटी, ३ वनडे, ५ टी-20 सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. अशा परिस्थितीत, अफगाणिस्तान मालिका रद्द झाल्यास, भारतीय खेळाडूंना WTC फायनल आणि वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान एक महिन्याची विश्रांती मिळू शकते.

अफगाणिस्तानविरुद्धची मालिका रद्द होऊ शकते

यानंतर टीम इंडियाला सप्टेंबरमध्ये आशिया कप आणि त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे. आयपीएलनंतर खेळाडूंना विश्रांती मिळाली नाही तर ते धोकादायक ठरू शकते. त्याचा परिणाम संघावरही होईल. अशा स्थितीत सततच्या क्रिकेटमुळे बीसीसीआय आता खेळाडूंना विश्रांती देण्याच्या मनस्थितीत आहे. यामुळेच अफगाणिस्तानविरुद्धची मालिका रद्द होऊ शकते.

भारतीय संघाचे पुढील वेळापत्रक

७ ते ११ जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल (लंडन)

जुलै-ऑगस्ट : वेस्ट इंडिज दौरा

कसोटी सामने: २

एकदिवसीय सामने: ३

T20 सामने: ३

सप्टेंबर: आशिया कप २०२३

आशिया कप २०२३ सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानच्या भूमीवर होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेचे अद्याप कोणतेही अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले नाही. पण या स्पर्धेत अंतिम सामन्यासह १२ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

सप्टेंबर-ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया दौरा

एकदिवसीय सामने: ३

T20 सामने: ५

ऑक्टोबर-नोव्हेंबर: वनडे वर्ल्ड कप

या स्पर्धेत ४८ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा भारतीय भुमीवर होणार आहे.

WhatsApp channel