मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  L'oreal Products : लॉरियल कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरल्यामुळं कॅन्सर?, महिलेचा कंपनीविरोधात खटला

L'oreal Products : लॉरियल कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरल्यामुळं कॅन्सर?, महिलेचा कंपनीविरोधात खटला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 22, 2022 02:15 PM IST

L'oreal Products : लॉरियल कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरल्यामुळं गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचा दावा करत एका महिलेनं कंपनीविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

Complaint Against L'oreal Company In America
Complaint Against L'oreal Company In America (HT)

Complaint Against L'oreal Company In America : लॉरियल कंपनीच्या हेयर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्स वापरल्यामुळं गर्भशयात कॅन्सर झाल्याचा दावा करत एका महिलेनं लॉरियल कंपनीविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. सौंदर्य प्रसाधनांच्या क्षेत्रात लॉरियल ही प्रसिद्ध कंपनी असून आता अमेरिकेत एका महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर कंपनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय आता सौंदर्य प्रसाधनांच्या वापरानंतर त्याच्या सुरक्षिततेचाही मुद्दा उपस्थित होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये राहणाऱ्या जेनी मिशेल नामक महिला गेल्या २० वर्षांपासून लॉरियल कंपनीचे हेयर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्स वापरत आहे. त्याच्या सततच्या वापरामुळं आणि त्यातील धोकादायक केमिकलमुळं गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचा दावा जेनीनं केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशा धोकादायक सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळं महिलांना आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्यानंतर आता आम्ही लॉरियल या कंपनीकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज केल्याचं जेनी मिशेल यांचे वकील बेन क्रम्प यांनी म्हटलं आहे.

या प्रॉडक्ट्सच्या वापरामुळं अनेक महिलांना अशा प्रकारचे आजार झाले असून जेनी ही त्यातलीच एक आहे, लॉरियल कंपनी नफ्यासाठी कृष्णवर्णीय महिलांची अनेक वर्षांपासून दिशाभूल करत असल्याचंही क्रम्प म्हणाले. या प्रकरणानंतर लॉरियल कंपनीनं अजून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.

कसा होतोय गर्भाशयात कॅन्सर?

केसांना सरळ करणाऱ्या केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं, असा दावा अलीकडेच ही नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या एका अहवालात करण्यात आला होता. ज्या महिलांनी वर्षातून चारपेक्षा जास्त वेळा या प्रॉडक्ट्सचा वापर केला आहे, त्यांना सामान्य महिलांच्या तुलनेत गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असल्याचं अहवालात सांगण्यात आलं होतं.

IPL_Entry_Point

विभाग