मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Khan Sir Viral Video: पाटण्यातील खान सरांचा तो वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल; कॉंग्रेसची कारवाईची मागणी

Khan Sir Viral Video: पाटण्यातील खान सरांचा तो वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल; कॉंग्रेसची कारवाईची मागणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 05, 2022 10:50 AM IST

Khan Sir Viral Video : पाटण्यातील प्रसिद्ध खान सर यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

Khan Sir Controversial Video
Khan Sir Controversial Video (HT)

Khan Sir Controversial Video : पाटण्यातील शिक्षक खान सर हे आपल्या संभाषणकौशल्यामुळं आणि अवघड विषय सोप्या पद्धतीनं शिकवण्यासाठी प्रसिद्ध मानले जातात. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. असाच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. त्यातच आता त्यांच्या वक्तव्यामुळं कॉंग्रेसनं त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, खान सर यांनी सुरेश आणि अब्दुल नावाचं उदाहरण देताना म्हटलं आहे की, सुरेश विमान उडवतोय पण सुरेशच्या जागी अब्दुल असेल तर तो विमान भडकवतोय, असं वादग्रस्त विधान खान सर यांनी केलं होतं. त्यानंतर खान सरांना तो वादग्रस्त व्हिडिओ कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत आणि लेखक अशोक कुमार पांडेय यांनी सोशल मीडियावर शेयर करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर खान सर यांची ती टिप्पणी व्यंग्यात्मक असून अपूर्ण व्हिडिओ शेयर केला जात असल्याचं प्रत्युत्तर खान सर यांच्या समर्थकांनी दिलं आहे.

कोण आहेत खान सर?

खान सर हे स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांच्या स्वस्तात शिकवणी घेतात. हिंदीभाषिक बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. ते ऑनलाईन कोचिंगमार्फत विद्यार्थ्यांना शिकवत असतात. रेल्वे भर्ती बोर्डाच्या परिक्षेवेळी विद्यार्थ्यांना हिंसेसाठी भडकवल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी खान सर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांपूर्वीच मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षकांनी वर्गात दहशतवादी संबोधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर आरोपी शिक्षकांनी विद्यार्थ्याची माफी मागितली असून महाविद्यालयानं शिक्षकाला निलंबित केलं आहे.

IPL_Entry_Point