मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UPSC Nurse Recruitment 2024: बीएससी नर्सिंग केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; असा करा अर्ज

UPSC Nurse Recruitment 2024: बीएससी नर्सिंग केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; असा करा अर्ज

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 09, 2024 01:07 PM IST

Government Jobs 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगाने कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नर्सिंग ऑफिसर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

UPSC Jobs Recruitment
UPSC Jobs Recruitment

UPSC Nurse Recruitment 2024: बीएससी नर्सिंग कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नर्सिंग ऑफिसर पदांसाठी रिक्त जागांसाठी अर्ज मागिवले जात आहेत. या पदासांठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नर्सिंग ऑफिसरच्या पदासाठी पात्र असलेले उमेदवार यूपीएससी वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मार्च २०२४ आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नर्सिंग ऑफिसर पदासाठी इच्छुक उमेदवारांकडे बीएससी नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग पदवी असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित राज्य किंवा केंद्रीय नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी देखील असणे आवश्यक आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण १ हजार ९३० पदांवर भरती करण्यात येणार आहे. यूपीएससीच्या या भरती परीक्षेद्वारे निवडलेल्या उमेदवारांची कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी राज्य विमा निगममध्ये नियुक्ती केली जाईल. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.

ओबीसी: १८ ते ३३ वर्ष

एससी/एसटी: १८ ते ३५ वर्ष

दिव्यांग: १८ ते ४० वर्ष

CBSE Recruitment : सीबीएसई भरणार वेगवेगळ्या श्रेणीतील ११८ पदे; कधीपासून निघणार अर्ज? वाचा

अर्ज शुल्क

सर्व उमेदवारांना अर्जासह २५ रुपये शुल्क जमा करावे लागेल. हे शुल्क एसबीआय किंवा कोणत्याही बँकेतून यूपीआय ​​किंवा ऑनलाइन पेमेंटद्वारे भरले जाऊ शकते. या भरतीसंदर्भात अधिक महिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी यूपीएसची अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

IPL_Entry_Point