मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mahavitaran recruitment : १२ वी पास असाल तर ही संधी सोडू नका! महावितरणमध्ये मोठी भरती सुरू

mahavitaran recruitment : १२ वी पास असाल तर ही संधी सोडू नका! महावितरणमध्ये मोठी भरती सुरू

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 09, 2024 01:37 PM IST

Mahavitaran Recruitment 2024 News : राज्य सरकारी कंपनी महावितरणमध्ये ५ हजारहून अधिक जागांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जाणून घ्या सविस्तर

१२ वी पास असाल तर ही संधी सोडू नका! महावितरणमध्ये मोठी भरती सुरू
१२ वी पास असाल तर ही संधी सोडू नका! महावितरणमध्ये मोठी भरती सुरू

Mahavitaran Recruitment 2024 News : बारावी पास तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात, महावितरणनं ५,३४७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) या पदांसाठी ही भरती होत असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज घेणं सुरू करण्यात आलं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२४ आहे.

भरती विषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे…

पदाचे नाव : विद्युत सहाय्यक

पदसंख्या : ५३४७ जागा

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार 

वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे

परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी - रुपये २५० + जीएसटी

मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी - रुपये १२५ + जीएसटी

अर्जपद्धती - ऑनलाइन

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण

पगार किती?

प्रथम वर्ष - १५,०००/-

द्वितीय वर्ष - १६,०००/-

तृतीय वर्ष - १७,०००/-

३ हजारहून जास्त जागा राखीव

महावितरणमध्ये होणाऱ्या ५३४७ पदांच्या भरतीमध्ये २०८१ पदं सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील. उर्वरित जागा राखीव असतील. त्यात अनुसूचित जाती ६७३, अनुसूचित जमाती ४९१, विमुक्त जाती (अ) १५०, भटक्या जाती (ब) १४५, भटक्या जाती (क) १९६, भटक्या जाती (ड) १०८, विशेष मागास प्रवर्ग १०८, इतर मागास प्रवर्ग ८९५ व आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) ५०० जागा राखीव असतील.

अधिकृत माहितीसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. 

IPL_Entry_Point