CBSE Recruitment 2024 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये (CBSE) नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. सीबीएसईमध्ये ए, बी आणि सी या श्रेणीतील विविध पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांना येत्या १२ मार्चपासून नोकरीसाठी अर्ज करता येणार आहेत.
सीबीएसईनं या भरतीच्या संदर्भात एक नोटीस काढली आहे. त्यानुसार, देशभरातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून (All India Competitive Exam) ही थेट भरती होणार आहे.
अ, ब आणि क अशा तीन गटांतील खालील पदांवर भरती केली जाईल. यात सहायक सचिव, लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, लेखापाल आणि कनिष्ठ लेखापाल या पदांचा समावेश आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांची भारतातील कुठल्याही राज्यात नोकरीसाठी नियुक्ती केली जाऊ शकते. निवडीनंतर देण्यात येणाऱ्या नियुक्ती पत्रात नोकरीच्या ठिकाणाची माहिती असेल.
सीबीएसईतील रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १२ मार्च २०२४ पासून सुरू होईल. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल २०२४ ही निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सीबीएसईच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
सीबीएसई लवकरच शैक्षणिक पात्रतेसह अधिकृत अधिसूचना जारी करेल अशी अपेक्षा आहे. त्यात अर्ज शुल्काशी संबंधित माहिती असेल. अधिकृत माहितीसाठी उमेदवारांनी केवळ cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अवलंबून राहावे.
सर्वप्रथम cbse.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
मुख्यपृष्ठावर ‘भरती विभाग’ दिसेल. तिथं क्लिक करा.
आता ‘लाइव्ह रिक्रूटमेंट/जाहिरातींची यादी’चे एक नवीन पेज उघडेल.
ज्या लिंकसाठी तुम्हाला विविध पदांसाठी अर्ज करायचा आहे ती लिंक शोधा आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढे जा.
आता अर्ज तुमच्यासमोर असेल.
अर्जामधील सर्व तपशील भरा.
संबंधित बातम्या