
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, सेल येथे ऑपरेटर-कम-टेक्निशियन (ट्रेनी) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरून sail.co.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेत संस्थेतील ३४१ पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
या भरतीसाठी २६ फेब्रुवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, १८ मार्च २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. या भरतीसाठी वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २८ वर्षे ठेवली आहे. तर, मागासवर्गीयांना वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवारांची पात्रता, निवड प्रक्रिया इतर महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
पात्र उमेदवारांना संगणक आधारित चाचणी (सीबीटी) हिंदी/ इंग्रजीमध्ये देणे आवश्यक आहे. सीबीटीमध्ये डोमेन नॉलेजवर ५० आणि अॅप्टिट्यूड टेस्टवर ५० अशा दोन विभागात १०० ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न असतील. सीबीटीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. वरील पदांसाठी सीबीटीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या क्रमाने कौशल्य चाचणीसाठी प्रत्येक पद/शाखेसाठी १:३ या प्रमाणात शॉर्टलिस्ट केले जाईल.
सर्वसाधारण / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज आणि प्रक्रिया शुल्क 500/- रुपये आणि एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी / ईएसएम / विभागीय उमेदवारांसाठी प्रक्रिया शुल्क 200/- रुपये आहे. उमेदवारांनी नेट बँकिंग / क्रेडिट कार्ड / एटीएम-कम-डेबिट कार्डद्वारे अर्ज आणि प्रक्रिया शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्क इतर कोणत्याही मार्गाने वसूल केले जाणार नाही.
संबंधित बातम्या
