मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ECIL Recruitment 2024: ईसीआयएलमध्ये विविध पदांसाठी भरती; महिन्याला ५५ हजार पगार मिळणार!

ECIL Recruitment 2024: ईसीआयएलमध्ये विविध पदांसाठी भरती; महिन्याला ५५ हजार पगार मिळणार!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 23, 2024 12:19 PM IST

ECIL Recruitment Selection Procedure: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

ECIL Recruitment
ECIL Recruitment (HT)

Electronics Corporation of India Limited Recruitment: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच ईसीआयएलमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती अतंर्गत प्रकल्प अभियंता, तांत्रिक अधिकारी आणि सहाय्यक प्रकल्प अभियंता या पदांसाठी १४ जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

या भरती अंतर्गत एकूण १४ जागेवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्यात प्रकल्प अभियंता- ०८ जागा, तांत्रिक अधिकारी- ०४ जागा आणि सहाय्यक प्रकल्प अभियंता पदाच्या ०२ रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२४ साठी निवडलेल्या उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे मासिक पगार मिळेल.

दुसरे वर्ष: मासिक वेतन- ४५ हजार

तिसरे वर्ष: मासिक वेतन- ५० हजार

चौथे वर्ष: मासिक वेतन- ५५ हजार

 

तांत्रिक अधिकारी-

पहिले वर्ष: मासिक वेतन- २५ हजार

दुसरे वर्ष: मासिक वेतन- २८ हजार

तिसरे वर्ष: मासिक वेतन- ३१ हजार

 

सहाय्यक प्रकल्प अभियंता-

पहिले वर्ष: मासिक वेतन- २४ हजार

दुसरे वर्ष: मासिक वेतन- २६ हजार ९५०

तिसरे वर्ष: मासिक वेतन- ३० हजार

चौथे वर्ष: मासिक वेतन- ३० हजार

Recruitment: एम्समध्ये ६९ प्राध्यापक पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

निवड प्रक्रिया:

इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. मुलाखत प्रक्रियेसाठी निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलवले जाईल. उमेदवारांना ०१ मार्च २०२४ रोजी कॉर्पोरेट लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर, नालंदा कॉम्प्लेक्स, TIFR रोड, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ईसीआयएल पोस्ट, हैदराबाद- ५०००६२. निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. मुलाखतीच्या वेळी अर्जदारांनी त्यांचा रीतसर भरलेला अर्ज संबंधित कागदपत्रांसह सोबत ठेवावा. अहवालाच्या वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी परवानगी दिली जाणार नाही.

  • अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी ईसीआयएलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

IPL_Entry_Point